Marathi News> मनोरंजन
Advertisement

पूनम पांडेचं अंजली अरोराबाबत मोठं वक्तव्य, म्हणाली...

 कंगना राणौतच्या शो 'लॉकअप'मध्ये  स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं सुरू झाली आहेत.

पूनम पांडेचं अंजली अरोराबाबत मोठं वक्तव्य, म्हणाली...

मुंबई : कंगना राणौतच्या शो 'लॉकअप'मध्ये  स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं सुरू झाली आहेत. शोमधील चांगले मित्र आता शत्रू झाले आहेत. तर काही शत्रूंमध्ये मैत्री होत आहे. हे थोडं विचित्र असलं तरी. आता मुनव्वर आणि अंजलीची वाढती जवळिकता पाहता त्यांची मैत्रीण पूनम पांडे आणि सायशा शिंदेला ही जवळिकता अजिबात आवडली नाहीये. 

तर पूनम आणि अंजली अरोरा ज्या कधीकाळी एकाच टीममध्ये होत्या. आता मात्र त्यांच्यातील वाद पेटला आहे. अंजलीने चार्टशीटमध्ये पूनमचं ​​नाव टाकलं आहे. यानंतर अभिनेत्रीने आपल्याच मैत्रिणीची पोलखोल केली आहे.

शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये पूनम सायशाला बाजूला घेते आणि मुनव्वर आणि अंजलीच्या नात्याबद्दल सांगते. पूनम म्हणते, तिने दोन वर्षांपासून चार रील बनवल्या आहेत. ही मुलगी कोविडच्यावेळी रील बनवून हिट फेमस झाली होती. मला काही फरक पडत नाही.

मी मनापासून या मुलीशी मैत्री केली. असे मित्र माझ्या शत्रूलाही मिळू नयेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपलं लग्न लपवून हा मुनव्वर ईथ एका २१ वर्षीय तरुणीला पटवत आहे.   इथे तिला अडकवून ठेवलं आहे. पुढे पूनम असंही म्हणाली की, अंजलीचा लॉकअपच्या बाहेर एक बॉयफ्रेंड आहे. पूनमच्या या बोलण्यावरून तिची मुनव्वर आणि अंजलीची मैत्री पूर्णपणे तुटल्याचं स्पष्ट होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याशिवाय लॉकअपमधील कैद्यांना एक वेगळा टास्क देण्यात आला आहे. या कामांतर्गत शिलाई मशीन वापरून दोन्ही ब्लॉक रुमाल बनवायचे आहेत. तुम्ही याआधी कोणत्याही सेलेब्सला शिलाई मशीन चालवताना पाहिलं आहे का? नाही, पण कंगनाच्या शोमध्ये तुम्हाला हा अनोखी टास्क आणि मजेदार टास्क पाहायला मिळणार आहे. 

Read More