Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aryan Khan च्या स्वागतासाठी मन्नत सजलं...

 जवळपास 25 दिवसांच्या कारावासानंतर आर्यनला अखेर जामीन मंजूर करण्यात आला.

 Aryan Khan च्या स्वागतासाठी मन्नत सजलं...

मुंबई : एनसीबीनं केलेल्या (NCB) कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या. जवळपास 25 दिवसांच्या कारावासानंतर आर्यनला अखेर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाकडून बऱ्याच युक्तीवादांनंतर देण्यात आलेला हा निकाल शाहरुखसाठी मोठा दिलासा देणारा ठरला.

निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आर्यन खानच्या जामीनची ऑर्डर सत्र न्यायालयात पोहोचली आणि त्याच्या वाटा मोकळ्या झाल्या. स्पेशल कोर्टाचा वेळ संपल्याने आर्यन खानची आजची रात्र जेलमध्येच जाणार आहे. 

fallbacks

पण उद्या आर्यन खान अखेर मन्नतवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या बंगल्यावर मोठी तयारी केली जात आहे. दिवाळी आधीच सजावटीला सुरुवात झाली आहे. संपुर्ण बंगल्यावर रोषणाई करण्यात येत आहे. 

mannat ki jannat 1.jpg

काल आर्यनचा जामीन मंजूर होताच त्यांच्या फॅन्सकडून घरासमोर फटाकेबाजी करण्यात आली. आर्यन घरी परतणार असल्यानं त्याच्या स्वागतासाठी खान कुटुंब आतुर झालं आहे. 

fallbacks


मुलाला घेण्यासाठी खुद्द शाहरुख खान आर्थर रोड कारागृह परिसरात पोहोचल्याचं म्हटलं गेलं. पण, जामीनाची प्रत कारागृहातील पेटीत निर्धारित वेळमर्यादेत न पोहोचल्यामुळे आर्यनची सुटका लांबली. 

 

 

 

 

Read More