Marathi News> मनोरंजन
Advertisement

लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलीचा बोल्ड अंदाज

लवकरच मराठी सिनेसृष्टीत करणार पदार्पण 

लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलीचा बोल्ड अंदाज

मुंबई : लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नावं. मराठी सोबतच बॉलिवूडमध्येही आपला वेगळा ठसा उमटवणारा हा दिग्गज कलाकार. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांना निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्यानंतरही ते सिनेमातून अजरामर आहेत. 

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे आजही आपलं मनोरंजन करत आहेतच. पण आता त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे देखील अभिनयात उतरला आहे. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा लक्ष्मीकांत यांची आठवण करून दिली. आता या पाठोपाठ लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे देखील सिनेसृष्टीत पदार्पण करेल अशी चिन्ह आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sweet and sassy!@maza_nav_sumeet Outfit- @benz.fashion Stylist-@devika_manjrekar

A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde) on

स्वानंदीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा स्कर्ट टॉपमध्ये दिसत आहे. या फोटोत तिचा अतिशय ग्लॅमरस लूक दिसत आहे. तिच्या या फोटोंवर खूप कमेंट आणि लाईक्स मिळत आहे.  डॅनिअल वेलिंगटन Danielwellington या घड्याळ्याचची जाहिरात स्वानंदी करताना दिसत आहे. 

स्वानंदीने आपल्या इंस्टाग्रामवर या आऊटफिटचे तीन फोटो शेअर केले आहेत. पण तिचं हे अकाऊंटच खास आहे. यावर स्वानंदीचे अतिशय सुंदर असे फोटो आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@bhargavi_chirmuley 

A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde) on

स्वानंदी आपल्या आई-वडिलांप्रमाणे चाहत्यांना भरपूर आनंद देईल यात शंका नाही. स्वानंदी 'रिस्पेक्ट' या सिनेमातून पदार्पण करणार आहे. तसेच किशोर बेळेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Read More