Marathi News> मनोरंजन
Advertisement

लतादीदी यांना आवडत नव्हत्या या गोष्टी म्हणून सोडला अभिनय?

हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा असा अपघात होण्यामध्ये नेमकी चूक कोणाची?

लतादीदी यांना आवडत नव्हत्या या गोष्टी म्हणून सोडला अभिनय?

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या करियरमध्ये 35 भाषा आणि 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. 

लतादीदींनी नाटक आणि सिनेमातही छोट्या भूमिका केल्या आहेत. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. मात्र लतादीदींसोबत असं काय घडलं ज्यामुळे त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पूर्णपणे संगीत क्षेत्रात आपलं योगदान दिलं. आज याबद्दल जाणून घेऊया. 

लतादीदींनी आपल्या वडिलांसोबत संगीत नाटकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. त्यांचं हेमा नावावरून लता होण्यामागेही रंजक किस्सा आहे. त्यांनी लतिकाची भूमिका केली होती. त्या भूमिकेनंतर दीदींना लता या नावाची वेगळी ओळख मिळाली. 

लतादीदी यांनी छोट्या छोट्या भूमिका नाटकांमध्ये भूमिका केली. गुरुकुल सिनेमामध्ये त्यांनी कृष्णाची भूमिका केली होती. लतादीदींना मेकअप करणं आणि कॅमेऱ्यासमोर येणं आवडत नव्हतं. सतत मेकअप करून कॅमेऱ्यासमोर येणं त्यांना पसंत नव्हतं. त्यामुळे अखेर त्यांनी अभिनय क्षेत्र सोडून पूर्णवेळ संगीत क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. 

एका मुलाखती दरम्यान लतादीदींनी सांगितलं होतं की माझ्या करियरची सुरुवात जरी झाली असली तरी त्यांचं मन तिथे कधीच रमलं नाही. त्यांनी पूर्णवेळ संगीत क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. गाण्याकडे त्यांच्या लहानपणापासूनच कल होता. 

आज लतादीदी जरी आपल्यात नसतील तरी त्यांचा आवाज आपल्यामध्ये आहे. तो आवाज अजरामर आहे. त्यांची गाणी सर्वांच्या मनामनात आजही आहेत आणि कायम राहातील. 

Read More