Marathi News> मनोरंजन
Advertisement

lata Mangeshkar Death : लतादीदी निधनानंतर मागे ठेवून गेल्या कोट्यवधींची संपत्ती

लतादीदींना संगीतचं नही तर महागड्या गाड्यांची देखील आवड  

lata Mangeshkar Death : लतादीदी निधनानंतर मागे ठेवून गेल्या कोट्यवधींची संपत्ती

मुंबई : ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. लतादीदी आता आपल्यात नाही, पण त्यांची कला, संगीत कायम आपल्यात असणार आहे. दीदी त्यांची कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवून गेल्या आहेत. दीदींना फक्त संगीताची नाही तर महागड्या गाड्यांची देखील आवड होती.

रिपोर्टनुसार दीदींना वयाच्या 13 व्या वर्षी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांची पहिली कमाई फक्त  25 रूपये होती.  आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 370 कोटी रूपयांची संपत्ती आहे. 

एवढंच नाही तर त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. फारपूर्वी दीदींनी एका मुलाखतीत गाड्यांवर असलेलं त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं. त्यांनी सर्व प्रथम Chevrolet गाडी खरेदी केली होती. 

महत्त्वाचं म्हणजे दीदींनी कार त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केली. त्यानंतर त्यांनी Buick आणि Chrysler या दोन गाड्या खरेदी केल्या. यश चोप्रा यांनी लतादीदींना एक मर्सिडीज कार भेट म्हणून दिली होती. 

एका मुलाखतीत दीदींनी सांगितलं, 'दिवंगत यश चोप्रा मला लहान बहिण मानायचे. 'वीरझारा' सिनेमाच्या म्युझीक प्रदर्शनादिवशी त्यांनी मला मर्सिडीज कारची चावी माझ्या हातात दिली आणि तुमच्यासाठी भेट वस्तू असल्याचं सांगितलं... त्यांनी दिलेली कार आजही माझ्याकडे आहे... '

आज भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या बातमीने संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरवली आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते. 

 

Read More