Marathi News> मनोरंजन
Advertisement

पायाला दुखापत झालेली असतानाही 'ही' अभिनेत्री करतेय शूटिंग, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

अभिनेत्री लारा दत्ताने शेअर केली एक वाईट बातमी 

पायाला दुखापत झालेली असतानाही 'ही' अभिनेत्री करतेय शूटिंग, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : अभिनेत्री लारा दत्ता भूपतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात ती म्हणालीये की, तिने पुन्हा शुटिंग सुरू केलं आहे. मात्र, लाराने एक वाईट बातमी देखील शेअर केली आहे. मुंबईमधील मांडवा येथे लारा गेली असता तिच्या पायाला दुखापत झाली आहे. यामुळे तिचे चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थाना करत आहेत. सोशल मीडियावर या बद्दलची माहिती देत लाराने एक पोस्ट शेअर केली आहे.

लाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलंय की, तिच्या पायाचं एक बोट मोडलं आहे. पोस्टमध्ये लिहिलं की, "मुंबईतील मांडवा, तुटलेल्या पायाच्या बोटाने मी शूटला पुन्हा सुरुवात करत आहे, मात्र काम करण्यास नक्कीच मी खूप उत्साही आहे. काम ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे." लाराच्या या फोटोमध्ये लाराने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. खुर्चीवर बसलेला हा फोटो लाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये, तिच्या उजव्या पायाचं बोटाला बँडेज केलं गेलं आहे.

जरी लाराने पुन्हा शूटिंग सुरू केल्याची घोषणा केली असली तरी, लारा कोणत्या प्रोजेक्टसाठी शुटिंग करत आहे हे उघड केलं नाही. 'बेल बॉटम' या चित्रपटात लारा सुपरस्टार अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. रणजित एम. तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'बेल बॉटम'मध्ये वाणी कपूर आणि हुमा कुरेशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. यापूर्वी हा चित्रपट एप्रिल 2021 मध्ये रिलीज होणार होता. पण देशातील कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे तो पुढे ढकलला गेला. लारा बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अशा परिस्थितीत तिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्यापासून लाराने एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयामुळे तिने इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान मिळवलं आहे.

Read More