Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुष्मिता सेनचं 6 महिन्यांपूर्वी झालं होत ब्रेकअप, कारण ऐकून थक्क व्हालं

16 वर्षाहून लहान मुलाला डेट करत होती सुष्मिता सेन, कोण होता हा तरूण ?

सुष्मिता सेनचं 6 महिन्यांपूर्वी झालं होत ब्रेकअप, कारण ऐकून थक्क व्हालं

मुंबई : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. ललित मोदींनी आपल्या ट्विटरवरुन सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर केल्यानंतर या चर्चांणा उधाण आले होते. मात्र त्य़ांनी लग्न न केल्याचं स्पष्टीकरण दिले असून ते एकमेकांना डेट करत असल्याची माहिती दिली. मात्र तुम्हाला माहितीय का ललित मोदीला डेट करण्यापूर्वी सुष्मिता सेन एका 16 वर्षाहुन लहान तरूणाला डेट करत होती. जाणून घेऊय़ात हा तरूण कोण आहेत तो?

 ललित मोदीच्या आधी सुष्मिता सेन रोहमन शॉल या तरूणाला डेट करत होती. मात्र सुष्मिताने काही महिन्यांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर दोघांचे ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले होते. सुष्मिता आणि रोहमनच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांची मनंही तुटली होती.

ब्रेकअपची पोस्ट 
सुष्मिता सेनने 23 डिसेंबर 2021 रोजी रोहमन शॉलसोबत ब्रेकअपची घोषणा केली. या घटनेला आता ६ महिने उलटले आहेत. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत रोहमनसोबतच्या ब्रेकअपची माहिती दिली होती. त्यावेळी सुष्मिताने पोस्टमध्ये लिहिले होते- 'आम्ही मैत्रीपासून सुरुवात केली आणि नेहमीच मित्र राहू. प्रदीर्घ नात्याचा काळ संपला आहे...पण प्रेम अजूनही आहे, असे तिने म्हटले होते. 

कोण आहे हा अभिनेता ? 
रोहमन शॉल एक फ्रीलान्स फॅशन मॉडेल आहे. रोहमनने अभिनयातही हात आजमावला आहे. रोहमन शॉल अॅमेझॉन प्राइमच्या हिअर मी, लव्ह मी या मालिकेतही दिसला आहे. या मालिकेत त्याच्यासोबत शिल्पा शेट्टीही होती. ही मालिका सप्टेंबर 2018 मध्ये रिलीज झाली होती. रोहमनने अनेक फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉकही केला आहे. रोहमनने सब्यसाचीसाठी स्टेज पार्टिसिपेंटही केला होता.

Read More