Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोण म्हणतं शिक्षणात कच्चे; शाहरूखपासून ते विजय सेतुपती... कोण किती शिकलं आहे?

Jawan Actors Education Qualification: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की नक्की या चित्रपटातील कलाकारांचे शिक्षण नक्की किती झाले आहे ते? 

कोण म्हणतं शिक्षणात कच्चे; शाहरूखपासून ते विजय सेतुपती... कोण किती शिकलं आहे?

Jawan Actors Education Qualification: सध्या 'जवान' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील कलाकारांचीही तूफान चर्चा रंगली आहे. तुम्हाला माहितीये का की, या चित्रपटातील कलाकारांचे शिक्षण किती झाले आहे? तुम्ही म्हणाल की 'जवान'च्या चित्रपटातील कलाकारांचे शिक्षण का चर्चेत आहे? पण हे जाणून रंजक ठरणार आहे. कारण तुम्हाला जाणून घेऊया धक्का बसेल की चक्क या चित्रपटात काम करणाऱ्यांचे शिक्षण ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 'जवान' या चित्रपटाची चर्चा चांगलीच आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती त्यावरून हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. आता 7 सप्टेंबर म्हणजे गोपालकाला या दिवशी शाहरूख खानचा 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या विशेष चर्चा रंगलेली आहे. सध्या सोशल मीडियावर ही फक्त 'जवान'चीच चर्चा रंगलेली आहे. या लेखातून आपण काहीतरी वेगळं जाणून घेऊया. 

  • शाहरूख खाननं हंस राज कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून आपलं बीएचं शिक्षण पुर्ण केलं आहे. नंतर त्यानं Jamia Millia Islamia मधून मास कम्युनिकेशनमधून मास्टर्स करायला घेतले होते परंतु ते त्यानं पुर्ण केलं नव्हते. 
  • नयनतारा ही साऊथची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मानली जाते. तिनंही या चित्रपटातून महत्त्वाची भुमिका केली आहे. तिनं मार्थोमो कॉलेज, थिरूवल्ला येथून इंग्लिश लिटरेचरमधून पदवी घेतली आहे. 
  • विजय सेतुपतीचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. धनराज बेड जैन कॉलेज, थोराईकाम येथून कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे. 
  • जवानमध्ये झळकणारी रिद्धी डोंगरा हिनं नेहरू कॉलेजमधून सायकोलॉजीतून पदवी घेतली आहे. 
  • सुनील ग्रोव्हर यांनं गुरू नानक कॉलेज, हरियाणामधून कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं आहे त्यानंतर त्यानं पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगढ येथून थिएटर या विषयात मास्टर्सची डिग्री घेतली आहे. 
  • प्रियामणी हिनंसुद्धा करिअर घेता घेता सायकोलॉजी विषयात बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आहे. 
  • सान्या मल्होत्रा हिचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिनं दिल्ली विद्यापीठातून बॅचलर्स डिग्री घेतली आहे. 

यावेळी जवानमध्ये फार मोठी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली असते. यावेळी 'जवान'चे एडव्हान्स बुकींग हे फारच तगडे होते त्यामुळे पहिल्याच दिवशीही या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. 

Read More