Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रसिद्ध अभिनेत्रीला टाईट ड्रेस घालण पडलं महागात, VIDEO आला समोर

टाईट ड्रेसमध्ये अभिनेत्रीची झाली वाईट अवस्था, VIDEO पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

प्रसिद्ध अभिनेत्रीला टाईट ड्रेस घालण पडलं महागात, VIDEO आला समोर

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री नेहमीच त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटवर जास्त लक्ष देतात.या स्टाईल स्टेटमेंटमुळे त्यांची इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण होत असते. मात्र हीच स्टाईल स्टेटमेंट त्यांच्या अनेकदा अंगलटही येते. अशीच घटना या अभिनेत्रीसोबत घडलीय. या अभिनेत्रीने इतकी टाईट ड्रेस घातली होती की, तिला चालणं देखील अवघड झालं होतं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.  

ज्या प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत, ती अभिनेत्री किम कार्दशियन (Kim Kardashian) आहे. ही अभिनेत्री हॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक असून तिच्या फॅशन सेन्ससाठी जगभरात ओळखली जाते. किम कार्दशियन कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. यावेळी किम कार्दशियनचा  (Kim Kardashian Video)  एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन चाहत्यांनी तिची किव येतेय. 

व्हिडिओत काय?
व्हिडिओतील किम कार्दशियनचा (Kim Kardashian) हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये किम सिल्व्हर सिक्वीन्ससह मॅक्सी ड्रेसमध्ये दिसत आहे. हा ड्रेस खूप घट्ट दिसत आहे. यामध्ये तिला चालणही अवघड जात आहे. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, किमचा  (Kim Kardashian Video)  मॅक्सी ड्रेस इतका फिट आहे की तिला चालताही येत नाही.तसेच शिड्या चढतानाही ती पायऱ्यांवर उडी मारतानाही दिसते. किमचा ड्रेस इतका टाईट आहे की तिला पाय एकत्रही उचलता येत नाही, अशा स्थितीत ती पायऱ्या चढते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

लुकची चर्चा 
किम (Kim Kardashian) सिल्व्हर सिक्वीन्ससह मॅक्सी ड्रेसमध्ये खुपच सुंदर दिसत आहे. सिल्व्हर कलरचा रंग तिच्या अंगावर खुलून दिसत आहे. तसेच हा ड्रेस इतका टाईट आहे ती फाटण्याचीही भिती आहे. या ड्रेसच्या कमरे जवळच्या दोन्ही बाजू ट्रान्सपरंट आहेत. चाहत्यांना किमचा (Kim Kardashian Video) हा लूक खूप आवडला आहे.  

किमचा (Kim Kardashian Video)  हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स विविध कमेंट करत आहेत. तसेच कमेंटमध्ये तिला नेटकरी असे आऊटफिट न घालण्याचा सल्ला देत आहे. तर काही नेटकरी या ड्रेसमध्ये डिझायनरची चूक काढत आह.  

Read More