Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर Kim Kardashian चा टॉपलेस अंदाज

 पती केन वेस्ट (Kanye West) सोबत घटस्फोट घेणार 

घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर Kim Kardashian चा टॉपलेस अंदाज

शिकागो : प्रसिद्ध अमेरिकन सिलेब्रिटी किम कार्दशियन (Kim Kardashian)ने नुकताच टॉपलेस फोटो शेअर करुन जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. SKIM’s या ब्रॅण्डसाठी तिने हे फोटोशूट केलंय. या फोटोत स्मोकी डोळे आणि ओठांमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसतंय. भारतात तिच्या चाहत्यांची कमी नाहीय. सोशल मीडियात किम कार्दशियनचे फोटो आणि व्हिडिओ खूप लाईक्स केले जातात. अशात ती पती केन वेस्ट (Kanye West) सोबत घटस्फोट घेणार अशी चर्चा होती. या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालंय. 

fallbacks

शुक्रवारी तिे पती केन वेस्टकडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत सात वर्षांच्या नात्याला पूर्णविराम दिला. TMZ वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलंय. समोर आलेल्या माहितीनुसार किमने मुलांची कस्टडी मागण्यासाठी अर्ज केलाय. 

दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं होतं. दोघे खूप दिवसांपासून वेगळे राहतायत.किम कार्दशियन (Kim Kardashian) यावेळी आपल्या 4 मुलांसोबत लॉस एंजलिसमध्ये राहते. पती रॅपर केन वेस्ट  (Kanye West) यावेळी यावेळी वियोमिंगमध्ये आपल्या फार्म हाऊसमध्ये आहे. किम (Kim Kardashian) आणि केन (Kanye West) यांचे सात वर्षांचं नात संपण्याच्या मार्गावर आहे. दोघांनी  2014 मध्ये लग्न केलं होतं. 

2007 मध्ये "Keeping Up With The Kardashians" या रिएलिटी शोमुळे ती घराघरात पोहोचली. या शोचा फायनल सिझन पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 2010 साली शोदरम्यान दोघांची ओळख झाली. त्यांनी रिलेशनमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता.

2013 मध्ये दोघांना नॉर्थ नावाचे पहिले अपत्य झाले. त्यानंतर 2014 साली इटलीमध्ये त्यांनी विवाह केला. केनने किमला सॅन फ्रॅन्सिस्को जाएंट्स बेसबॉल स्टेडीयममध्ये फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं. 

पण हे नातं टिकू न शकल्याने तिने स्वत: हून केनपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय.  बराच काळ  किम (Kim Kardashian) ने केन (Kanye West) सोबत फोटो देखील शेअर केला नव्हता.  

fallbacks

किम (Kim Kardashian) आणि केनने 4 महिन्यांपुर्वी एकत्र फोटो शेअर केला होता. याआधी दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत रहायचे. लॉकडाऊन काळात दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यामुळे किम खूप त्रासलेली होती. केन वेस्ट घरी असून देखील किमला सर्व काम करावं लागायचं अशी चर्चा होती.

Read More