Marathi News> मनोरंजन
Advertisement

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण 'KBC 15'चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..

KBC 15 Winner Jaskaran Singh: जसकरण सिंग हा पंजाबमधील खाल्डा येथील रहिवाशी आहे. तरन तारण जिल्ह्यात हे एक छोटेसे गाव असून ते भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. जिथून पाकिस्तान अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. 

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण 'KBC 15'चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..

KBC 15 Winner Jaskaran Singh: 'कौन बनेगा करोडपती सीझन 15' ने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. दरम्यान या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. जसकरण सिंग असे या पहिल्या करोडपतीचे नाव आहे. जसकरणने आतापर्यंत 1 कोटी रुपये जिंकले आहेत. शोचे होस्ट अमिताभ बच्चन त्याला 7 कोटी रुपयांचा प्रश्न विचारणार आहेत. हा एपिसोड बुधवारी प्रसारित होणार आहे.  7 कोटी रुपयांसाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे. काय आहे हा प्रश्न? जसकरण कोण आहे? काय म्हणतो आणि तो कुठून आला आहे हे देखील जाणून घ्या.

जसकरण सिंग हा अवघ्या 21 वर्षांचा तरुण आहे. तो एका गरीब कुटुंबातून पुढे आला आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तो यूपीएससीची तयारी करत आहे आणि केबीसीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत केली आहे.

जसकरण सिंग हा पंजाबमधील खाल्डा येथील रहिवाशी आहे. तरन तारण जिल्ह्यात हे एक छोटेसे गाव असून ते भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. जिथून पाकिस्तान अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे. शो दरम्यान जसकरणने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. 

मला माझे कुटुंब शहरात हलवायचे आहे जिथे त्यांना मूलभूत सुविधांसाठी समस्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी इच्छा त्याने बोलून दाखवली. जसकरणचे वडील केटरिंगचे काम करतात आणि आजोबा चणे विकतात आणि आजीचे किराणा दुकान असल्याची माहिती त्याने दिली. 

G-20 साठी जगभरातील दिग्गज भारतात, सर्वसामान्यांना याचा काय फायदा? जाणून घ्या

केबीसीमध्ये प्रवेश करण्याचा चौथा प्रयत्न 

मला माझ्या कुटुंबाला आरामदायी जीवन द्यायचे आहे. मी नेहमी माझ्या कुटुंबाला आरामदायी जीवन देण्याचे स्वप्न पाहिले. केबीसीमध्ये दिसण्याचा जसकरणचा हा चौथा प्रयत्न होता. याआधीही त्याने तीन वेळा या शोसाठी प्रयत्न केले आहेत. पण त्यात त्याला यश मिळाले नाही. आपण कधी ना कधी यशापर्यंत पोहोचू याची त्याला खात्री होती. म्हणून तो प्रयत्न करत राहीला. अखेर केबीसीच्या 15 व्या सिझनमध्ये त्याला 1 करोडपर्यंत पोहोचता आले.

मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; 'ही' घ्या अर्जाची लिंक

हा 7 कोटींचा प्रश्न

जसकरणने एक कोटी रुपये जिंकले आहेत. पण आता त्याला 7 कोटी रुपये जिंकण्यासाठी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. 'पद्मपुराणानुसार, वाघाच्या रूपात 100 वर्षे घालवणारा राजा कोण होता? त्याला हरीण असल्याचा शाप मिळाला होता?' या प्रश्नाचे उत्तर तो देतो की नाही? हे पाहायला मिळणार आहे. दरम्यान तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Read More