Marathi News> मनोरंजन
Advertisement

KBC 14 : 75 लाख रुपयांच्या या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला शो, तुम्हाला माहितीये का उत्तर?

पाहा कोणत्या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला शो...

KBC 14 : 75 लाख रुपयांच्या या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला शो, तुम्हाला माहितीये का उत्तर?

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे 14 वे पर्व सुरु आहे. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारत खेळ पूर्ण करताना दिसतात. हा शो नेहमीच स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टींमुळे आणि अमिताभ यांनी सांगितलेल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये रोल ओव्हर कंटेस्टंट असणाऱ्या कोमल गुप्ता यांनी 50 लाख रुपये जिंकले. मात्र ७५ लाखांच्या प्रश्नावर त्यांची गाडी अडकली आणि त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. 

आणखी वाचा : तीन लग्न करणारा पवन कल्याण कोट्यवधींचा मालक; राजकारणतही सक्रीय...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'जो चार लोकांसमोर आपलं नाव घेऊ शकत नाही....', जेव्हा रेखा यांच्यावर जया बच्चन संतापल्या

वेट लिफ्टिंगपटू असणाऱ्या कोमल यांनी राष्ट्रीय स्तरावर पदकंही जिंकली आहेत. वयाच्या 11 व्या वर्षापासून वेट लिफ्टींग करणाऱ्या कोमल यांचे प्रेरणास्त्रोत त्यांचे वडीलच असल्याचं कार्यक्रमात सांगितलं. आपल्या सगळ्याच लाइफलाइनचा अगदी योग्य पद्धतीने वापर करुन कोमल यांनी 50 लाख रुपये जिंकले. 

आणखी वाचा : धक्कादायक! 'ते' खासगी फोटो वापरत अभिनेत्रीला केलं ब्लॅकमेल, शेवटी तिनं...

ऑडियन्स पोल, 50-50 आणि फोन अ फ्रेण्ड या सर्वच लाइफलाइनच्या माध्यमातून कोमल यांनी जिथे उत्तर माहित नव्हत किंवा त्यांना तेव्हा लाइफलाइनचा वापर केला. 50 लाखांच्या प्रश्नाचंही त्यांनी योग्य उत्तर दिलं. पण त्या 75 लाख रुपयाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाही. चला तर प्रश्न काय होता पाहूयात…

आणखी वाचा : रशियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य आलं समोर, तरूणी सुंदर केस आणि त्वचेसाठी करतात 'या' पदार्थांचा वापर

1973 साली अराबेला आणि अनीटा नावाचे दोन जीव अंतराळामध्ये काय करणारे पहिले सजीव ठरले? A) घरटं बनवणं B) जाळं विणणे C) पंखांचा वापर करुन उडणे D) जन्म देणे 

आणखी वाचा : गणपतीच्या आगमणासोबत रितेश-जिनिलियाच्या घरी 'या' पाहूण्यानं केली एण्ट्री

कोमल यांना या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते. त्यांच्याकडे कोणतीही लाइफलाइन उपलब्ध नव्हती त्यामुळे त्यांनी शो क्वीट करण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचं उत्तर B) जाळं विणणे आहे. 

Read More