Marathi News> मनोरंजन
Advertisement

KBC : अखेर पहिल्या प्रेमाबाबत बिग बींनी सोडलं मौन, व्यक्त होत म्हणाले...

अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम कोण, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला गेला

KBC : अखेर पहिल्या प्रेमाबाबत बिग बींनी सोडलं मौन, व्यक्त होत म्हणाले...

मुंबई : महानायक, शेहनशहा, बिग बी अशी एक ना अनेक नावं असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विविध चित्रपट, जाहिराती आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून हा चेहरा आपल्या भेटीला आला आणि पाहता पाहता दर वेळी नवे उलगडे करत गेला.

बिग बींनी ज्याप्रमाणे रुपेरी पड़दा गाजवला, त्याचप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यानंही प्रेक्षकांच्या नजरा वळवल्या. कलाविश्वात आतापर्यंतच्या कारकिर्दीत बिग बींच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांची काही प्रेमप्रकरणं ही गाजली. काही अभिनेत्रींशी त्यांची नावंही जोडली गेली. 

अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम कोण, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला गेला. ज्यानंतर आता खुद्द बच्चन यांनीच (KBC13) केबीसीच्या मंचावर याचा उलगडा केला. पुण्यातील दिप्ती तुपे हिच्यासमोर त्यांनी या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

दिप्तीला कार्यक्रमात मोठ्या रकमेचं बक्षीस जिंकता आलं नाही. पण, इथं तिनं आपल्याच अनोख्या अंदाजात मात्र प्रेक्षकांचं आणि बच्चन यांचंही मन जिंकलं. 

दिप्तीचा परिचय करुन देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमात एक व्हिडीओ दाखवण्यात आला. जिथं ती जगण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसते, सायकलही चालवताना दिसते. हा व्हिडीओ संपल्यानंतर दिप्तीनं बिग बींना पिकू सिनेमासाठी त्यांनी सायकल चालवण्यास शिकलेली की, थेट ते सायकल चालवू लागलेले? असा प्रश्न विचारला. 

यावर उत्तर देत, माणूस जीवनात काही गोष्टी कधीही विसरु शकत नाही, त्या म्हणजे सायकलिंग, स्विमिंग आणि ...... पहिलं प्रेम असं बच्चन म्हणाले. पहिलं प्रेम म्हणण्यासाठी त्यांनी थोडासा विराम घेतला. त्यांच्या या उत्तराने सेटवर उपस्थितांना हसू आवरलं नाही. शिवाय आजही अमिताभ बच्चन यांच्या जीवनात पहिल्या प्रेमाला महत्त्वाचं स्थान आहे हेसुद्धा स्पष्ट झालं. 

Read More