Marathi News> मनोरंजन
Advertisement

Video: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा

Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. 

Video: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा

Kaavaalaa Dance by Girl: रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी या चित्रपटातील गाणं 'कव्वाल्ला'ची सर्वत्रच चर्चा आहे. आपल्याला माहिती आहेच की, सध्या हे गाणं सर्वत्र गाजतं आहे. त्यामुळे या गाण्यावर नेटकरी नाच करण्यातच दंग झाले आहेत. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका व्हायरल व्हिडीओची. यावेळी एका तरूणीनं 'कव्वाल्ला' गाण्यावर डान्स केला आहे. काही दिवसांपुर्वी 'कव्वाल्ला' गाण्यावर एका जॅपनीज युट्यूबरनंही तूफान डान्स केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता या तरूणीचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. या तरूणीनं यावेळी सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली आहे सोबतच केस मोकळे सोडले असून तिच्या अदाकारीनं प्रेक्षक हे घायाळ झाले आहे. तेव्हा चला तर पाहुया या व्हिडीओला नेटकऱ्यांनी कसा प्रतिसाद दिला आहे. 

सध्या युट्युबवर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. हिंदी आणि दाक्षिणात्त्य गाण्यांवरही सोशल मीडियावर चांगलेच व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. तरूण आणि तरूणी यावर बेभान डान्स करतात. या तरूणीचा तूफान डान्स हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साडीत, मस्त ढगाळ आणि थंड वातावरणात केलेला हा डान्स पाहून नेटकरी वेडे झाले आहेत. तमन्ना भाटियाला तिनं तंतोतंत फॉलो केलं आहे. तिच्या अदाकारीवर सगळेच फिदा झाले आहेत. 

हेही वाचा : Made in Heaven वर प्रसिद्ध फॅशन डिझानरचा आरोप, Warning देत म्हणाले...

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. @mily_chakrabortz4 या मुलीनं ही पोस्ट शेअर केली आहे. आपल्या इन्टाग्रामवरून तिनं ही पोस्ट शेअर केली आहे. रजनीकांत यांच्या 'कव्वाल्ला' या गाण्याची चांगलीच क्रेझ काय आहे हे या व्हिडीओवरून समजते आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याचवर्षी 'बहरला हा मधुमास' हे गाणंही तूफान व्हायरल झालं होतं. त्यामुळे या गाण्यानंतर आता सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'कव्वाल्ला' या गाण्याची, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

Read More