Marathi News> मनोरंजन
Advertisement

Vicky - Katrina च्या लग्नामुळं जयपूरमध्ये 'या' गोष्टीचा तुटवडा

पाहा जयपूरमध्ये नेमकं काय घडतंय.... 

Vicky - Katrina च्या लग्नामुळं जयपूरमध्ये 'या' गोष्टीचा तुटवडा

जयपूर : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या बहुचर्चित रिलेशनशिपनंतर आता ही जोडी लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात 7 ते 9 या तारख्यांदरम्यान हा विवाहसोहळा राजस्थानातील जयपूरमध्ये थाटात पार पडणार आहे. 

सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्सेस लक्झरी येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे. कॅट आणि विकीचे मॅनेजर, काही खास मित्र आतापासूनच विवाहस्थळी पोहोचले आहेत. (Katrina Kaif Vicky kaushal)

इतकंच नव्हे, तर आता म्हणे संपूर्ण जयपूरमध्ये या लग्नामुळं एका महत्त्वाच्या गोष्टीचा तुटवडा पडू लागला आहे. ज्याचा परिणाम सर्वसामान्य पर्यटकांवर होण्याची शक्यता आहे. 

कतरिना आणि विकीच्या विवाहसोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या गरजा पाहता त्यांच्या टीमकडून कार रेंटल सर्व्हिसकडून कार सेवा बुक करण्यात आली आहे. 

एसयूव्ही मॉडेलपासून अनेक हायएंड आणि आधुनिक सेवा असणाऱ्या कार इथं बुक झाल्या आहेत. एअरपोर्टपासून पिकअप- ड्रॉप सुविधेपासून नजीकच्या परिसरात फेरफटकामारण्यापर्यंतच्या गरजांसाठी या कार बुक आहेत. 

एकाच वेळी अनेक कार बुक झाल्यामुळं तिथं येणाऱ्या सर्वसामान्य पर्यटकांना मात्र कारसेवेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. 

कोरोना नियमांमध्ये शिथिलता आल्यामुळे अनेकांनीच पर्यटनस्थळांच्या वाटा धरल्या आहेत. अशातच विकी- कतरिनाचा विवाहसोहळाही याच दिवसांमध्ये असल्यामुळं ही परिस्थिती उदभवल्याचं म्हटलं जात आहे.  

Read More