Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pregnancy च्या चर्चांमध्येच कतरिनाकडून विकीला खास गिफ्ट, पाहताच तो शॉक

कतरिनाने विकीसोबतचा दोन फोटो शेअर केलेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'न्यूयॉर्क वाला वाढदिवस' माय लव्ह असे इमोजी शेअर करत कॅप्शन लिहलंय.

Pregnancy च्या चर्चांमध्येच कतरिनाकडून विकीला खास गिफ्ट, पाहताच तो शॉक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Koushal)याने काल सोमवारी 34 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्याला अनेक अभिनेते-अभिनेत्रींसह त्याच्या मित्र-मैत्रिणी कुटूंबियांसह चाहत्यांनी वाढदिवसाच्या शूभेच्छा दिल्या. यामध्ये सर्वात विशेष गिफ्ट ठरलं ते बॉलिवूड अभिनेत्री, पत्नी कतरिना कैफने (katrina kaif) दिलेले. तिने विकीसाठी इतकं मोठ सरप्राईज दिले की, हे गिफ्ट पाहून विकी कौशललाही आश्चर्याचा धक्का बसला. 
 
विकी कौशलवर (Vicky Koushal) वाढदिवसानिमित्त शूभेच्छांचा वर्षाव होतोय. विकी कौशलच्या वडिलांनी लहानपणीचा व आता तरूणपणाचा असे दोन फोटो शेअर करत, 'तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मुला, असे कॅप्शन लिहत वाढदिवसाच्या शूभेच्छा दिल्या. तसेच विकीच्या भावाने सुद्धा विकीसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शूभेच्छा दिल्या. 

कतरिनाचं खास पोस्ट 
कतरिनाने विकीसोबतचा दोन फोटो शेअर केलेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'न्यूयॉर्क वाला वाढदिवस' माय लव्ह असे इमोजी शेअर करत कॅप्शन लिहलंय. तर शेवटी तुम्ही सर्व काही चांगले करता, असेही तिने लिहलेय. या पोस्टला कमेंट करताना 'लग्नाचा वाढदिवस' असे विकीने लिहिलय. 

विकीची बर्थडे पोस्ट 
विकीने आपला बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याचे न्यूयॉर्कमधले मित्र-मैत्रिणीही सामील झाले होते. तूम्ही दिलेल्या शुभेच्छांना मी स्विकारतोय. तसेच शुभेच्छांबद्दल खुप खुप आभार, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.     

Read More