Marathi News> मनोरंजन
Advertisement

झीरोच्या सेटवरुन लीक झालेले कतरिनाचे फोटोज व्हायरल....

शाहरुख खान स्टारर झिरो सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

झीरोच्या सेटवरुन लीक झालेले कतरिनाचे फोटोज व्हायरल....

मुंबई : शाहरुख खान स्टारर झिरो सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सिनेमाच्या सेटवरुन काही दिवसांपूर्वी कतरिना कैफचा एक लूक व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा कतरिनाचा सेटवरील ब्रायडल लूक कॅमेऱ्यात कैद झाला. यात कतरिना अत्यंत सुंदर दिसत आहे.

पहा फोटोज...

हे तिघे पुन्हा एकत्र

या सिनेमात अभिनेता अभय देओलही आहे. तो कतरिनाच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत दिसेल. तर शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. जब तक है जान या सिनेमानंतर शाहरुख-अनुष्का-कतरिना पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. यात शाहरुख ठेंगण्या व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाचा पहिली झलक समोर आली असून त्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

लीक झालेला लूक व्हायरल

झिरो हा सिनेमा यावर्षी २१ डिसेंबरला प्रदर्शित होईल. सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल. राय. करत आहेत. शाहरुख सिनेमाच्या सेटवरील फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतो. तर कतरिनाचा लीक झालेला हा लूक चांगलाच व्हायरल झाला आहे. 

 

Read More