Marathi News> मनोरंजन
Advertisement

आगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यननं घेतलं तगडं मानधन? आकाडा वाचून बसेल धक्का

Kartik Aryan Movie Fees: कार्तिक आर्यन सध्या आपल्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या अभिनयाची फारच चर्चा रंगलेली दिसते आहे. यासाठी त्यानं तगडी फी घेतल्याचे कळते आहे. त्याचीच सध्या चर्चा रंगली आहे. 

आगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यननं घेतलं तगडं मानधन? आकाडा वाचून बसेल धक्का

Kartik Aryan Movie Fees: अभिनेता कार्तिक आर्यन आपल्या आगळ्यावेगळ्या भुमिकेसाठी ओळखला जातो. मागच्या वर्षी आलेल्या त्याच्या 'भुलभुलैया 2' या चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत तूफान वाढ झाली होती. या चित्रपटामुळे सुपरस्टारच्या यादीत कार्तिक आर्यन गणला गेला. त्याच्या या चित्रपटातील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती म्हणजे 'भुलभुलैया 3' या चित्रपटाची. परंतु सध्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेव्हा या ट्रेलरचीही सध्या सर्वत्र चर्चा आहे. भुलभुलैया चित्रपटानंतर, कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांचीच चर्चा रंगली आहे. 

परंतु तुम्हाला माहितीये का की या चित्रपटासाठी कार्तिक आर्यननं किती मानधन घेतलं आहे? आकाडा वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कार्तिक आर्यन हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. आत्तापर्यंच्या मानधनापेक्षा कार्तिक आर्यननं आपल्या आगामी चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतले आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा रंगली आहे. एका नामवंत वेबसाईटनुसार, सत्यप्रेम की कथा या आपल्या आगामी चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यननं 25 कोटी रूपये मानधन घेतले असल्याचे सांगितले जाते आहे आणि कियारानं या चित्रपटासाठी 4 कोटी रूपयांचे मानधन घेतले आहे. मात्र याबाबत कुठलीही अद्यापही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

 'भुलभुलैया 2' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तेव्हा या चित्रपटामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी प्राप्त झाली होती. आपल्या मानधनात त्यानं या चित्रपटानंतर मोठी वाढ केल्याच्या बातम्याही पसरू लागल्या होत्या. त्यामुळे कार्तिक आर्यनची विशेष चर्चाही रंगली होती. कार्तिक आर्यन कायम वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आता तो आपल्या महागड्या फीजसाठी चर्चेत आला आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद आलेला पाहायला मिळला आहे. तेव्हा आता चर्चा रंगली आहे. ती म्हणजे कार्तिकच्या फीची. 

हेही वाचा - देवानंद यांच्या नातीला पाहिलं का? बड्या सेलिब्रिटी किड्सना देतेय टक्कर

कार्तिकनं अनेकदा आपल्या बॉलिवूडमधील स्ट्रगलबद्दल खुलासा केला आहे. त्याचबरोबर नेपोटिझमवरही त्यानं अनेकदा भाष्य केले आहे. परंतु आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईल आणि अभिनयासाठी तो ओळखला जातो. मध्यंतरी सारा आली खान आणि कार्तिक आर्यनच्या अफेअरची चर्चा रंगली होती. त्यांनी 'लव्ह आज कल 2' या चित्रपटात एकत्र काम केले होते. 

Read More