Marathi News> मनोरंजन
Advertisement

'रोमान्स करत असतानाच म्हणाली भैय्या...', Kartik Aryan चा अभिनेत्रीसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल

Kartik Aryan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कार्तिक अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. 

'रोमान्स करत असतानाच म्हणाली भैय्या...', Kartik Aryan चा अभिनेत्रीसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल

Kartik Aryan Romance With Archana Gautam Video Viral : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट ‘शहजादा’ (Shehzada) मुळे चर्चेत आहे. कार्तिक सगळीकडे या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच कार्तिक एका शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेला होता. यावेळी कार्तिकसोबत रोमान्स करताना ती अभिनेत्री चुकून त्याला भैया असं म्हणाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रोमान्स करत असताना अचानक काय झाले ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. 

कार्तिकनं लोकप्रिय दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर फराह खानसोबत 'बिग बॉस 16' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी कार्तिकला या शोमध्ये असलेली स्पर्धक आणि अभिनेत्री अर्चना गौतमसोबत (Archana Gautam) रोमॅंटिक सीन करण्यास फराह खान (Farah Khan) सांगते. पण काही क्षणातच हा रोमॅंटिक सीन कॉमेडी सीनमध्ये बदलतो. कारण अर्चना रोमॅंटिक सीन करत असताना कार्तिकला चूकुन भैय्या बोलते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फराहनं अर्चनाला कार्तिकसोबत किचनमध्ये आल्याचा चहा बनवत असल्याचा सीन करण्यास सांगितले. यावेळी मागून कार्तिक येतो आणि तिला कंबरेला पकडतो. यावेळी अर्चना बोलते अहो, सोडा नाही तर आई पाहतील. रोमॅंटिक सीन पूर्ण करत कार्तिक तिला सोडण्यास नकार देतो. त्यावर पटकन अर्चना बोलते की कोणत्या गेटनं आलात भैय्या. हे ऐकल्यानंतर कार्तिकसोबत तिथे उपस्थित असलेले सगळेच स्पर्धक हसू लागतात आणि अशा प्रकारे रोमॅंटिक सीन कॉमेडी सीन होतो. अर्चना गौतमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अर्चनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर त्यांच्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काही नेटकरी म्हणाले की इतक्या हॅंडसम अभिनेत्याला तू भैय्या कशी बोलू शकतेस. दुसरा नेटकरी म्हणाला की कार्तिक आर्यन तुझ्यासोबत रोमान्स करतोय आणि तू त्याला भैय्या म्हणालीस. 

हेही वाचा : 'Sex किंवा Shahrukh Khan...', नेहा धुपियाचं धक्कादायक वक्तव्य

दरम्यान, कार्तिक आर्यनसोबत 'शहजादा' या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवनने केले आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. कार्तिक सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या आधी कार्तिक 'फ्रेडी'मध्ये दिसला. तर त्याआधी कार्तिक 'भूल भुलैया 2' मध्ये दिसला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती.

Read More