Marathi News> मनोरंजन
Advertisement

कार्तिककडून साराला शुभेच्छा देण्याचं खास कारण

साराला 'केदारनाथ' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्तिककडून साराला शुभेच्छा देण्याचं खास कारण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान चांगलीच चर्चेत आहे. 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकताच ६४ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. साराला 'केदारनाथ' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचा आनंद साराने कुटुंबासह साजरा केला. साराने पुरस्कारासह एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And that’s a schedule wrap for me in Delhi 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

तिच्या या पोस्टवर अभिनेता कार्तिकने कमेंट केले आहे. तो म्हणाला, 'फक्त कॉफीवर काम चालणार नाही, तर दिल्लीत पार्टी द्यावी लागेल.' दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' चॅट शोमध्ये सारा उपस्थित होती. साराने या शोमध्ये एक महत्वपूर्ण खुलासा केला होता. ती म्हणाली, 'मला कार्तिक फार आवडतो, आणि मला त्याला डेट करायला नक्कीच आवडेल'

सध्या सारा - कार्तिक 'लव आज कल 2' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 'लव आज कल 2' सिनेमाची शुटिंग दिल्लीत होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कार्तिक आणि सारा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. 

अभिनेता रणदीप हुड्डा सुद्धा चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'लव आज कल २' चित्रपट 'लव आज कल' सिनेमाचा सिक्वल असणार आहे. 'लव आज कल' सिनेमा १० वर्षांआधी प्रदर्शित झाला आहे. यात चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. 

Read More