Marathi News> मनोरंजन
Advertisement

'म्हारे हिवडा में नाचे मोर' गाण्याला करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रेनं केलं रिक्रिएट..., तुम्ही VIDEO पाहिलात का?

Karisma Kapoor And Sonali Bendre :  करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे या दोघींनी 'हम साथ साथ है' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील 'म्हारे हिवडा में नाचे मोर' या गाण्याला त्यांनी आता रिक्रिेएट केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'म्हारे हिवडा में नाचे मोर' गाण्याला करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रेनं केलं रिक्रिएट..., तुम्ही VIDEO पाहिलात का?

Karisma Kapoor And Sonali Bendre : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. परंतु सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह असल्याने चाहत्यांमध्ये तिची लोकप्रियता आजही कायम आहेच. 90 च्या दशकातील ही यशस्वी असलेली सोनाली तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असते. नुकतंच सोनालीनं तिचा एका व्हिडीओ शेअर केला असून त्यामुळे ती चर्चेत अली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सोनालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाली 1999 साली प्रदर्शित झालेल्या तिच्या 'हम साथ साथ है' या चित्रपटातील तिची सह-कलाकार करिश्मा कपूरसोबत दिसली. या व्हिडीओत त्या दोघी 'म्हारे हिवडा में नाचे मोर' या आयकॉनिक गाण्यावर नाचताना दिसत आहेत. करिश्मा कपूरसोबतचा तिचा नव्या व्हिडिओ नं 90 च्या दशकातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सोनालीनं कॅप्शन दिलं की "याचा रिमेक करायचा होता... जी जुन्या सोनेरी दिवसांची एक आठवण करून देणारा !"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटातील अनेक कलाकारांनी या व्हिडीओ खाली कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री तब्बूने स्मायली इमोजीसह कमेंट करत या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. करिश्माच्या कमेंटला उत्तर देताना नीलमने लिहिले की, 'आनंदी आठवणी'. सूरज बडजात्याचा 'हम साथ साथ है' हा 1999 मध्ये प्रदर्शित झालेला एक मल्टीस्टारर चित्रपट होता, ज्यामध्ये सलमान खान, सैफ अली खान, मोहनीश बहल, तब्बू, करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे आणि इतर दर्जेदार कलाकार होते.

हेही वाचा : पत्नी मृत्यूशी झुंज देत असताना रुग्णालयातच चाहत्याने केली विनोद सादर करण्याची मागणी; अभिनेत्याच्या आयुष्यातील विचित्र किस्सा

सध्या सोनाली बेंद्रे ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकांच्या भूमिकेत दिसत आहे. करिश्मा विषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'ब्राउन: द फर्स्ट केस" या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये करिश्मा एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजची निर्मिती अभिनय देव करत आहेत. करिश्मानं तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'मेंटलहूड' या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण केले.

Read More