Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO ट्रेलर : 'करणजीत कौर' कशी बनली 'सनी लिओन', पाहा...

'बॉलिवूडची अशी अभिनेत्री जिला जितकं प्रेम मिळतंय तितकीच संख्या तिचा तिरस्कार करणाऱ्यांची आहे'

VIDEO ट्रेलर : 'करणजीत कौर' कशी बनली 'सनी लिओन', पाहा...

नवी दिल्ली : एका पॉर्न स्टारपासून बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा सनी लिओनचा प्रवास आता ऑनलाईन पडद्यावरही दिसणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा सीझनच सुरू आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही... त्यातच आता सनीच्या आयुष्यावर बेतलेली 'करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन' नावाची वेब सीरिज ऑनलाईनच्या माध्यमातून समोर येतेय. या वेब सीरिजचा ट्रेवलर काही वेळापूर्वी प्रदर्शित करण्यात आलाय. सनीचं आयुष्य एका कथेच्या स्वरुपात यात दिसणार आहे. 

'बॉलिवूडची अशी अभिनेत्री जिला जितकं प्रेम मिळतंय तितकीच संख्या तिचा तिरस्कार करणाऱ्यांची आहे' असं म्हणत या वेब सीरिजमध्ये सनीची ओळख करून दिली जातोय. 

सनीचा जन्म कॅनडाचा... तिचं नाव करणजीत कौर वोहरा आहे. कुटुंबाच्या आर्थिक समस्या तिला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये करिअरसाठी प्रोत्साहक ठरल्याचं या ट्रेलरमधून दिसतंय. सनीचा तिचा भाऊ संदीपसोबतही चांगली केमिस्ट्री या व्हिडिओत दाखवण्यात आलीय. 

Read More