Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' अटीवर सैफसोबत लग्न करण्यास तयार झाली करिना

चित्रपटाच्या सेटवर त्यांचे नाते मात्र बहरण्यास सुरूवात झाली. 

'या' अटीवर सैफसोबत लग्न करण्यास तयार झाली करिना

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांच्या विषयी माहिती करून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यापैकी एक कपल म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर. दोघांनी मंगळवारी त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यांच्या या नात्यावरून असं स्पष्ट की प्रेमाला कसलीचं बंधन नसतात. हवा असतो तो म्हणजे फक्त विश्वास. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

King, Prince and Que

'टशन' चित्रपटामध्ये या दोन प्रेमी युगूलांनी एकत्र काम केलं. चित्रपट तर चाहत्यांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला. पण याच चित्रपटाच्या सेटवर त्यांचे नाते मात्र बहरण्यास सुरूवात झाली. अखेर या नात्याचे रूपांतर विवाह बंधनात झाले. पण सैफसोबत विवाह बंधनात अडकण्यापूर्वी करिनाने सैफपुढे काही अटी घातल्या होत्या. 

त्यानंतर, सैफने त्या अटी मान्य देखील केल्या. 'मी तुमची पत्नी आहे आणि मी शेवटपर्यंत बॉलिवूडमध्ये काम करणार.' शिवाय सैफने पूर्णपणे माझ्या करियरमध्ये मला पाठिंबा द्यावा अशी अट बेबोने पती सैफसमोर ठेवली होती. १६ ऑक्टोबर २०१२ साली सैफ-करिना विवाह बंधनात अडकले. 

लग्नानंतर २० डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले. मुंबईच्या ब्रिच कँडी रूग्णालयात तिने तैमूरला जन्म दिला. सध्या करिना तिच्या आगामी 'गुड न्यूज' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्याचप्रमाणे सैफ त्याच्या आगामी 'लाल कप्तान' चित्रपटात व्यस्त आहे. 

Read More