Marathi News> मनोरंजन
Advertisement

तैमूर खानने 'त्या' मुलाला मारला जोरदार ठोसा, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Taekwondo Competition : सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी आपल्या मित्रांना धू-धू धुतलं. 

तैमूर खानने 'त्या' मुलाला मारला जोरदार ठोसा, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

fallbacks

Taimur and Abram Khan : बॉलिवूडमधील (Bollywood) अभिनेता आणि अभिनेत्री सोशल मीडियावर (Social media) जेवढे प्रसिद्ध आहेत. तसंच बॉलिवूड स्टार्सची मुले म्हणजे स्टार किड्सदेखील (bollywood star kids) सोशल मीडियावर तुफान लोकप्रियक आहे. यामध्ये पहिलं नाव येतं सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) मुलगा तैमूर खान (Taimur Khan)...दुसरं नाव घ्यायचं झालं तर शाहरुख खान आणि गौरी खानचा (Gauri Khan) मुलगा अबराम खान...

शाहरुख आणि करीनाच्या मुलांनी मित्रांना धू-धू धुतलं

अनेकदा तैमूर पापाराझींच्या (Paparazzi) कॅमेऱ्यात कैद होतो. तर कित्येकदा तो स्वत:ही फोटोसाठी पोझ देताना दिसला आहे. तैमूर आणि अबरामचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी आपल्या मित्रांना धू-धू धुतलं. (Kareena Kapoor son Taimur and Shah rukh Khan Son Abram Taekwondo Competition VIDEO npm)

काय झालं नेमकं?

तर आता आम्ही तुम्हाला सांगतो की, मुंबईत (Mumbai)तायक्वांदो स्पर्धेचं (Taekwondo Competition) आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये तैमूरसह बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सने भाग घेतला होता. तैमूरचा हा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. तैमूरने ही स्पर्धा जिंकली आहे. 

अबरामने तायक्वांदोमध्ये दाखवले कौशल्य

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) छोटा मुलगा अबराम (Abram Khan) यानेही खेळात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अबरामला प्रोत्साहन देण्यासाठी शाहरुख खान, भाऊ आर्यन (Aryan) आणि बहीण सुहानाही (Suhana) पोहोचले. अबराम रेड कलरच्या 'हेडगियर'मध्ये स्पर्धा करताना दिसत आहे. तायक्वांदो स्पर्धेत आपले कौशल्य दाखल्यानंतर अबराम विजयी ठरला आहे. विशेष म्हणजे,तायक्वांदो हा मार्शल आर्टचा कोरियन प्रकार आहे.

fallbacks


विजेत्या मुलांना म्हणजे तैमूर आणि अबराम यांनी अभिनेता शाहरुख खान यांच्या हस्ते मेडल देण्यात आलं. यावेळी शाहरुख खानने दोन्ही मुलांचं खूप कौतुक केलं. 

Read More