Marathi News> मनोरंजन
Advertisement

या गोष्टीने kareena kapoor करते दिवसाची सुरुवात, बेडरुममधील तो फोटो आला समोर

तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळते.

 या गोष्टीने kareena kapoor करते दिवसाची सुरुवात, बेडरुममधील तो फोटो आला समोर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या सोशल मीडिया पोस्ट खूपच मजेदार असतात. ती बऱ्याचदा आपल्या डेली लाईफमधील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

अभिनेत्रीच्या इन्स्टा पोस्ट्स पाहून तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळते. करीना कपूर खानने तिच्या नवीन पोस्टमध्ये सांगितले आहे की कशाप्रकारे ती आपल्या दिवसाची सुरुवात करते.

करीना कपूर खानची सकाळ कशी आहे?

करिनाने सैफ अली खान आणि तैमूरचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोत सैफ अली खान बेडवर बसून नाश्ता करत आहे. सैफच्या हातात मोबाईल आहे. तो करीनाकडे पाहत आहे, आणि ती सैफचे फोटो क्लिक करत आहे.सैफच्या बाजूला तैमूर अभ्यास करत आहे. चित्र रेखाटताना दिसत आहे.

fallbacks

या फोटोला कॅप्शन देत करिना लिहिते, माझी सकाळ...
सैफ- बेबो तू इंस्टाग्रामसाठी फोटो क्लिक करत आहेस?
मी- ममम.... क्लीक

पुढे करिनाने माय बॉईज असं लिहित हा बेडरुम फोटो पोस्ट केला आहे. करिनाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिला सैफ अली खान आणि मुलांपासून वेगळे राहावे लागत होते.

आता कोरोनावर मात केल्यानंतर ती कुटुंबासोबत हॅपी लाईफ जगतानाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे.

Read More