Marathi News> मनोरंजन
Advertisement

सगळं व्यवस्थित असताना अचानक करीना कपूर का झाली ट्रोल?

 तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सगळं व्यवस्थित असताना अचानक करीना कपूर का झाली ट्रोल?

Kareena Kapoor Wedding Anniversary:  करीना कपूर कायमच तैमूरसोबत स्पॉट झाली की ट्रोल होत (Kareena Kapoor and Taimur Ali Khan)असते. मागच्या पाच-सहा वर्षात तैमुरमुळे करीना कपूर लाईमलाईटमध्ये आली होती. आजही तैमूरची जोरदार चर्चाही होत असते. तैमुरच नाही तर करीना आणि सैफ अली खानची लव्हस्टोरीही (Kareena Kapoor and Saif Ali Khan Love Story) कायमच चर्चेत असते. यंदाही करीना आणि सैफ अली खानची लव्ह स्टोरी ट्रेण्डमध्ये आहे. यंदाच कारणही विशेष आहे कारण करीना आणि सैफची 10 वी वेडिंग अन्व्हर्सी (Kareena Kapoor and Saif Ali Khan Wedding Anniversary) आहे. (kareena kapoor and saif ali khan wedding anniversary kareena gets trolled photo goes viral)

सैफ अली खानचं करीना कपूर खानसोबतचं हे दुसरे लग्न असलं तरी आज त्यांची जोडी सर्वात जास्त लोकप्रिय आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. परंतु इतका चांगला दिवस असूनही करीना कपूर मात्र ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. (Kareena Kapoor Trolled) याच कारणंही समोर आलं आहे. करीनानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सैफ अली खानसोबतचा आपला (Kareena Kapoor Instagram Post) फोटो शेअर केला आहे. या फोटोवर बॉलीवूड सेलिब्रेटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. करीनाच्या चाहत्यांनी करीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु काहींना मात्र करीनाला ट्रोल केलं आहे. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

हे जोडपं त्यांच्या लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी करीनानं फार उशिरा अर्धा दिवस संपून गेल्यावर सैफसोबचा फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत सैफ पत्नी करीनाच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसत आहे. 

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

हा फोटो करीनानं लेट पोस्ट केल्यानं तिच्यावर काही चाहते नाराज झालेले पाहायला मिळाले. परंतु सध्या हे फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करीना आणि सैफचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही त्यांचा मोठा मुलगा तैमूर उर्फ ​​टिमसोबत (Tim) दिसत आहेत.  सैफ आणि करिनाने शर्ट आणि डेनिममध्ये कॅज्युअल लूक कॅरी केला आहे. 

Read More