Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिग बींना पाहताच बेशुद्ध झाला करण जोहर?

बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीमध्ये करण जोहर दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' चित्रपट नेहमीच अग्रस्थानी असतो. 

बिग बींना पाहताच बेशुद्ध झाला करण जोहर?

मुंबई : बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीमध्ये करण जोहर दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' चित्रपट नेहमीच अग्रस्थानी असतो. या चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली होती. त्यापैकीच एक पार्टी सॉग्न 'बोले चूडिया'ला आजही यूट्यूबवर चाहत्यांची पसंती मिळते आहे. १८ वर्षांनंतर या गाण्याला यूट्यूबवर ४०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

करण जोहरने 'बोले चूडिया' हे गाणं माझ्या करियरमधील सर्वात अविस्मरणीय गाणं असल्याचं म्हटलंय. या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर किस्सा करणने शेअर केला. या चित्रपटातून पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. अशा महान कलाकाराला पाहून मी अतिशय नर्वस झालो आणि मी जवळपास बेशुद्धच होणार असल्याचं करण म्हटलंय.  

'कभी खुशी कभी गम' चित्रपटात शाहरुख खान, काजोल, करिना कपूर, हृतिक रोशन, जया बच्चन, अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत, प्रेक्षकांचीही चांगली पसंती मिळवली होती. या चित्रपटाला ५ फिल्मफेयर अवॉर्डही मिळाले आहेत.

Read More