Marathi News> मनोरंजन
Advertisement

'25 वर्षांपासून इंडस्ट्री...', कॉमेडी शोमध्ये खिल्ली उडवण्यामुळं करण जोहर नाराज

Karan Johar : करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इंडस्ट्रीवरील लोकांवर संताप व्यक्त केला आहे.

'25 वर्षांपासून इंडस्ट्री...', कॉमेडी शोमध्ये खिल्ली उडवण्यामुळं करण जोहर नाराज

Karan Johar : लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत होतो. अनेकदा काही नसताना तो ट्रोलिंगचा शिकार होतो. त्यावर बऱ्याचवेळा तो त्याची प्रतिक्रिया देखील देतो. पण आता करण जोहरला या सगळ्या गोष्टीचा संताप येत नाही किंवा वाईट वाटत नाही. त्याला या गोष्टीचं वाईट वाटतं की इंडस्ट्रीमध्ये तो इतका जुना असूनही त्याला लोक ट्रोल करतात. इतकंच नाही तर इंडस्ट्रीतील लोकांना त्याची किंमत नाही. हाच विचार करुन त्याला वाईट वाटतं. अशात एका कॉमेडी शोमध्ये त्याची खिल्ली उडवण्यात आली. ज्यानंतर करण जोहरनं नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु: ख व्यक्त केलं आहे. 

खरंतर, करण जोहरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं सांगितलं की कशा प्रकारे एका शोमध्ये त्याची खिल्ली उडवण्यात आली. ते देखील इंडस्ट्रीच्या लोकांनी. हे पाहिल्यानंतर त्याला खूप वाईट वाटलं. यावर करण जोहरनं एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला शेअर करत त्यानं लिहिलं की "मी माझ्या आईसोबत बसून टिव्ही पाहत होतो. त्यावेळी मी एका रिअॅलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला, ते देखील एका मोठ्या चॅनेलवर असलेल्या." करणनं सांगितलं की "एक कॉमिक आर्टिस्टनं शोमध्ये माझी खूप वाईट पद्धतीनं मिमिक्री केली. या सगळ्याची अपेक्षा मी एखाद्या ट्रोलरकडून करु शकतो, जे त्यांचं नाव, चेहरा लपवून काहीही करतात. पण, आता ते लोक खिल्ली उडवत आहेत, जे इंडस्ट्रीचा भाग आहेत. ती पण अशा व्यक्तीची जो गेल्या 25 वर्षांपासून इंडस्ट्रीचा भाग आहे." करणचं म्हणणं आहे की "कोणत्याही व्यक्तीचे हाव-भाव सांगतात की तो कोणत्या काळात जगत आहेत. या सगळ्या गोष्टींचा आता मला राग येत नाही, तर वाईट वाटतं."

fallbacks

हेही वाचा : समांथानं शेअर केला 'तो' आक्षेपार्ह फोटो, चूक कळताच केला डीलिट! फेक पोस्ट पाहून संतापले चाहते

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, आता करण कोणत्या शोविषयी बोलत असेल तर तो सोनी टीवीवर प्रदर्शित होत असलेला 'मॅडनेस मचाएंगे' आहे. नुकताच त्याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात कॉमेडियन केतन सिंग हा करण जोहरची मिमीक्री करताना दिसतोय. केतननं ‘कॉफी विद करण’ ला टॉफी विद चूरण असं नाव देत खिल्ली उडवली होती. तर या क्लिपमध्ये तो करण जोहरसारखं बोलतना दिसत आहे आणि डान्स करताना नक्कल देखील करत आहे. इतकंच नाही तर केतननं करण जोहर स्टार किड्सला लॉन्च करण्यावरून देखील खिल्ली उडवली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी ही देखील दिसत आहे. 

Read More