Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिल शर्माची छोट्या पडद्यावर घर वापसी, जाणून घ्या कधी सुरू होणार शो!

कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मा लवकरच एक शो घेऊन येत आहे. या शोमधून कपिल स्वत:ला रिलॉन्च करत आहे. 

कपिल शर्माची छोट्या पडद्यावर घर वापसी, जाणून घ्या कधी सुरू होणार शो!

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परत येतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मा लवकरच एक शो घेऊन येत आहे. या शोमधून कपिल स्वत:ला रिलॉन्च करत आहे. 

मोठा पडदा फ्लॉप, छोटा पडदा हिट

‘फिरंगी’ हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर कपिल शर्माने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री घेण्याचे ठरवले. आहे. या नव्या शोसाठी त्याने नुकतच टीझरचं शूट केल्याचही समजतं. तसेच या टीझरमध्ये शोमध्ये असणारे इतर कलाकारही दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या शोबाबत चर्चा होत आहेत. 

कधी येणार शो?

कपिल शर्माचा हा नवा शो मार्च महिन्यात येणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. लवकरच सोनी टीव्हीवर या शोचा टीझर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिलचा हा नवा शो सोनी टीव्हीवर असणार आहे. आणि मार्च महिन्यात ऑन एअर जाणार आहे. पण अजूनही या शोचं टायटल ठरलेलं नाहीये. 

कपिल-सुनील वाद

कपिल शर्मा आणि सुनील गोव्हर यांच्यातील वाद चांगलाच गाजला. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर दोघांनी वाद मिटवले असून दोघेही एकत्र शो करणार अशाही चर्चा झाल्या. या शोमध्ये कपिल आणि सुनील एकत्र दिसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण सुनील यात असेल की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read More