Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चा धुमाकूळ; आत्तापर्यंत कमावले इतके कोटी

बॉक्स ऑफिसवर 'कंतारा'चा यशस्वी प्रवास थांबण्याचं नाव घेत नाही आहे.

बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चा धुमाकूळ; आत्तापर्यंत कमावले इतके कोटी
Updated: Nov 14, 2022, 06:08 PM IST

मुंबई : ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) कन्नड चित्रपट 'कांतारा'ची (Kantara) जादू अजूनही कायम आहेत. कारण सिनेमा रिलीज झाल्याच्या चौथ्या आठवड्यातही बक्कळ गल्ला जमवत आहे. या चित्रपटाने बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.सध्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खुप चर्चा आहे.  

 पौराणिक कथांवर आधारित 'कांतारा' (Kantara) कन्नडमध्ये 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला की त्याच्या निर्मात्यांनी कांतारा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये रिलीज केला. रिलीजनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) 23 दिवसांचा मोठा पल्ला गाठला आहे. मात्र, कमाईच्या बाबतीत त्याचा वेग अजूनही कायम आहे.

बॉक्स ऑफिसवर 'कंतारा'चा यशस्वी प्रवास थांबण्याचं नाव घेत नाही आहे. विशेष म्हणजे, हॉम्बल फिल्म्सच्या कांताराच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत चित्रपटाने एकूण 75.95 कोटींची कमाई केल्याचं सांगण्यात येत आहे. बहुतेक हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसतात अशावेळी या चित्रपटाने हिंदीमध्ये आपली शान फडकवली आहे.

'कंतारा'च्या पहिल्या आठवड्यातील बॉक्स ऑफिस आकड्यांवर नजर टाकल्यानंतर, चित्रपटाने 14 ऑक्टोबर, शुक्रवारी पहिल्या दिवशी 1.27 कोटींची कमाई करून हिंदी मार्केटमध्ये पदार्पण केलं. 15 ऑक्‍टोबर, शनिवारी दुस-या दिवशी 2.75 कोटी आणि तिसर्‍या दिवशी 3.5 कोटी कलेक्शन केलं होतं. तसंच, पहिल्या सोमवारी, 17 ऑक्टोबर रोजी, चित्रपटाने 1.75 कोटींचे निव्वळ कलेक्शन केलं.

हिंदीमध्ये, तिकीट दर कमी करूनही, पहिल्या दिवसाच्या तुलनेत कलेक्शनमध्ये 40% ते 50% ची अभूतपूर्व वाढ झाली. या आठवड्यातही सिनेमाने खूप चांगली कमाई केली आहे.

5 नोव्हेंबर रोजी 4.15 कोटींची नोंद झाली. चित्रपटाने 6 नोव्हेंबर रोजी हिंदी मार्केटमध्ये 4.5 कोटी कमावले आणि 7 नोव्हेंबर रोजी 2 कोटी कमाई केली. या चित्रपटाने 8 नोव्हेंबर रोजी 1.5 कोटी, 9 नोव्हेंबर रोजी 1.25 कोटी, 10 नोव्हेंबर रोजी 1.25 कोटी, 11 नोव्हेंबर, 12 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबर रविवारी 2.3 कोटी कमाई करून हिंदी बाजारात 2.7 कोटी कमाई केली.

बॉक्स ऑफिसवरील जबरदस्त धावा व्यतिरिक्त, 'कंतारा'ने भारतातील सध्याच्या टॉप 250 चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं जे नुकतंच IMDb ने प्रदर्शित केलं.

कांताराची कन्नड आवृत्ती आणि हिंदी आवृत्ती 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर रोजी रिलीज झाली. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केलं आहे. होंबळे फिल्म्स अंतर्गत विजय किरगांडूर आणि चालुवे गौडा निर्मित, या चित्रपटात ऋषभ शेट्टी, सप्तमी गौडा आणि किशोर कुमार प्रमुख भूमिकेत आहेत.