Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी राजकारणात पैसै कमावण्यासाठी...'; BJP कडून तिकिट मिळाल्यानंतर कंगनाकडून घराणेशाहीचा उल्लेख

Kangana Ranaut on getting into Politics : कंगना रणौतनं राजकारणात येण्याचं कारण काय याचा खुलासा केला आहे. 

'मी राजकारणात पैसै कमावण्यासाठी...'; BJP कडून तिकिट मिळाल्यानंतर कंगनाकडून घराणेशाहीचा उल्लेख

Kangana Ranaut on getting into Loksabha Politics : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या तिच्या राजकारणातील एन्ट्रीसाठी तयारी करत आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली आहे. कंगनानं आता राजकारणात येण्याचं कारण सांगितलं आहे. कंगनानं म्हटलं की भारतानं तिच्यासारख्या एका कलाकाराला खूप काही दिलं आहे आणि ते या समाजाला परत देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी राजकारण येणं हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. 

'या' कामासाठी कंगनानं घेतली राजकारणात एन्ट्री

कंगनानं 25 मार्च रोजी म्हणजे काल एका कार्यक्रमा दरम्यान, यावेळी कंगनानं त्याच्याशी बोलताना सांगितलं की तिच्यासाठी राजकारण हे पैसे कमावण्याचं किंवा लोकप्रियता मिळवण्यासाठी नाही, तर देशाची सेवा करण्याचा एक मार्ग आहे. कंगनानं म्हटलं की "देव हा दयाळू आहे आणि त्याचा माझ्यावर नेहमीच आशीर्वाद राहिला आहे. माझ्यासाठी राजकारण हे प्रसिद्धी मिळवण्याचे किंवा पैसे कमविण्याचे साधन नाही, तर राजकारण माझ्यासाठी जनतेची सेवा करण्याचा मार्ग आहे. लोकप्रिय व्यक्ती आणि अभिनेत्री या नात्यानं आपण अशा टप्प्यावर पोहोचतो, जिथे प्रेक्षकही आपल्याकडून समाजाला काही तरी परत देण्याच्या संदर्भात अपेक्षा करतात. माझ्याजवळ जे काही आहे, ते सगळ्या लोकांमुळेच तर आहे आणि भाजप हा लोकांचा पक्ष आहे. मी या गोष्टीची खात्री करुन घेईन की मी यात कोणतीही कसर सोडणार नाही आणि लोकांनी मला जे आशीर्वाद किंवा प्रेम दिले आहे, त्या तुलनेत जास्त मी परत देईन. मी नेपोटिझम (घराणेशाही) हा शब्द वापरला होता आणि मला असं म्हणायचं आहे की भाजप हा निःपक्षपाती दृष्टिकोन आणि कार्यपद्धती असलेला राजकीय पक्ष आहे."

हेही वाचा : कंगनाच्या बोल्ड फोटोला काँग्रेस नेत्याची अश्लील कॅप्शन; अभिनेत्री म्हणाली, 'वेश्याव्यवसाय..'

अभिनेत्री नाही तर कार्यकर्ता 

कंगनानं हे देखील सांगितलं की "ती एक बॉलिवूड कलाकार म्हणून नाही तर पक्षाची कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कंगनानं सांगितलं की या पक्षात मी एक बॉलिवूड कलाकार म्हणून नाही तर एक कार्यकर्त्याच्या रुपात असणार आहे. पक्ष आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीकोणातून मी काम करेन. आज इथे खूप लोक जमा झाले आहेत आणि त्यांनी मला यासगळ्यात त्यांचे मार्गदर्शन करण्याची संधी देण्यात आली आहे." 

Read More