Marathi News> मनोरंजन
Advertisement

कंगना रनौतची केरळच्या पूरग्रस्तांना मदत

कंगनाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

कंगना रनौतची केरळच्या पूरग्रस्तांना मदत

मुंबई : केरळमध्ये आलेल्या पुरामुळे सध्या स्थिती भयानक आहे. देशभरातून केरळला मदतीचा ओघ सुरु आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी केरळला मदत दिली आहे. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आहे. कंगना रनौतने केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 10 लाख रुपये दिले आहेत. आपल्या वडिलांचा सल्ला घेतल्यानंतर तिने केरळला 10 लाखांची मदत केली आहे. 

कंगनाची ऑनलाईन मदत

मागील अनेक दिवसांपासून कंगना व्यस्थ आहे. केरळच्या पूरग्रस्ताना मदतीची इच्छा तिने तिच्य़ा वडिलांकडे बोलवून दाखवली. वडिलांच्या सल्ल्यानंतर कंगनाने 10 लाखांची मदत दिली आहे. कंगनाने देशातील सर्व नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही जी मदत करु शकता ती मदत करा. मदतीसाठी पुढे या असं आवाहन तिने केलं आहे.

ओव्हरटाईम करतेय कंगना

कंगना सध्या 'मणिकर्णिका' सिनेमासाठी खूप मेहनत घेते आहे. या सिनेमासाठी ती सकाळी 8 वाजल्यापासून उशिरा रात्रीपर्यंत काम करते आहे. हा सिनेमा तिच्यावर जबाबदारी सारखा आहे. ज्यामुळे अनेकदा ती ब्रेकडाउन देखील झाली आहे. ती या सिनेमासाठी बेस्ट देण्याचा प्रयत्न करते आहे.

Read More