Marathi News> मनोरंजन
Advertisement

मेंटल आहेस का?... म्हणत हे दोन कलाकार सेटवर भिडले

का भांडतात असे.. 

मेंटल आहेस का?... म्हणत हे दोन कलाकार सेटवर भिडले

मुंबई : बॉलिवूडमधील सेलिब्रिटींमधील वाद काही नवीन नाही. पण जेव्हा एकाच सिनेमातील कलाकार सेटवरच भिडतात तेव्हा... अगदी असच झालं आहे. बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय कलाकार राजकुमार राव आणि कंगना रानावत एकमेकांशी भर सेटवर वाद करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

राजकुमार राव आणि कंगना रानावत यांचा 'मेंटल है क्या' हा सिनेमा 22 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच पोस्टर रिलीज झाला आहे. हे दोघं एकमेकांशी अजबप्रकारे बोलताना दिसत आहेत. मेंटल है क्या... असं म्हणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कंगना रानावत राजकुमार रावसोबत भांडताना दिसत आहे. जर तुम्ही विचार करत असाल हे दोघं खरंच भांडत असतील तर हा व्हिडिओ जरूर बघा. 

हा व्हिडिओ अगदी धमाकेदार आहे. या व्हिडिओ कंगना - राजकुमारची टक्कर होते. आणि दोघं एकमेकांना विचारतात की, मेंटल है क्या? हा सिनेमा 22 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. हा व्हिडिओ कंगनाने ऑफिशिअल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Read More