Marathi News> मनोरंजन
Advertisement

दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा कमी; तरी प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' ची प्रेक्षकांना भुरळ

Kalki 2898 AD Box Office Collection :  प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्या 'कल्कि 2898 एडी' नं दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

दुसऱ्या दिवशी कमाईचा आकडा कमी; तरी प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' ची प्रेक्षकांना भुरळ
Updated: Jun 29, 2024, 11:31 AM IST

Kalki 2898 AD Box Office Collection : दाक्षिणात्य अभिनेता 'कल्कि 2898 एडी' नं प्रदर्शइत होताच बॉक्स ऑफिसवर जम बसवला आहे. ओपनिंग डेला चित्रपटानं कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 'कल्कि 2898 एडी' नं बक्कळ कमाई केली आहे. त्याच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे. त्यासोबत कलेक्शन हे 150 कोटींच्या पार गेलं आहे. 

चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करण्यास सुरुवात केली आणि दिवशी हेच चित्र पाहायला मिळतंय. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स, कहानी आणि स्टारकास्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपट समीक्षकांनी देखील या चित्रपटाला चांगली प्रतिक्रिया दिली आहे. चला तर जाणून घेऊया किती कमावले. 

पहिल्या दिवशी केली इतकी कमाई 

सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'कल्कि 2898 एडी' नं पहिल्या दिवशी  95.3 कोटींची कमाई केली. तर हिंदीत 22.3 इतक्या कोटींची कमाई केली. तेलगूमध्ये चित्रपटानं 65.8 कोटींची कमाई केली. तमिळमध्ये या चित्रपटानं  4.5 कोटींची कमाई केली, तर मल्याळमध्ये या चित्रपटानं 2.2 कोटींची कमाई केली. तर जगभरात या चित्रपटानं 175 कोटींची एकूण कमाई केली आहे. 

दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई 

रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 54 कोटींची कमाई केली आहे. तर यावेळी सगळ्यात जास्त कलेक्श हे तेलुगू भाषेत आणि मग त्यामागे त्यांनी हिंदीमध्ये जास्त कमाई केलीय इंडियन बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटानं भारतात दोन दिवसात 149.3 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड कलेक्शविषयी बोलायचे झाले तर जवळपास  250 कोटींचा आकडा पार करत आहे. दरम्यान, आता पुढे जाऊन हा चित्रपट कोणता रेकॉर्ड मोडेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

हेही वाचा : सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा नाईट क्लबमधील 'तो' व्हिडीओ समोर...

दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या या चित्रपटात विष्णु देवाच्या आधुनिक काळातील रुपावर आहे. त्यांच्याविषयी असं म्हटलं जातं की ज्या देवशी पृथ्वीवर वाईटाचं साम्राज्य असेल तर कल्कीचा जन्म होईल. तर या चित्रपटाच अश्वत्थामाची भूमिका ही अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात दीपिका पदुकोण, कमल हासन, दिशा पटानी यांच्या भूमिका आहेत. तर विजय देवरकोंडा आणि दुलकर सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले.