Marathi News> मनोरंजन
Advertisement

'प्रेग्नंट दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर...', अभिनेत्याचा खुलासा

Kalki 2898 AD Pregnant Deepika Padukone Draged By Hair : 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात प्रेग्नंट असलेल्या दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर तिथेच उपस्थित होता आणि...

'प्रेग्नंट दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर...', अभिनेत्याचा खुलासा

Kalki 2898 AD Pregnant Deepika Padukone Draged By Hair : 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटानं फक्त देशात नाही तर परदेशात देखील बॉक्स ऑफिसवर कमालीची कामगिरी केली आहे. या चित्रपटानं अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. चित्रपटात खूप कमालीची स्टारकास्ट आहे. तर या चित्रपटात कमांडर मानसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शाश्वत चटर्जीच्या कामाची सगळीकडे स्तुती होत आहे. तर दुसरीकडे दीपिका पदुकोण विषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.

'न्यूज 18' ला दिलेल्या या मुलाखतीत सास्वतनं चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर वक्तव्य केलं. जिथे त्याची भूमिका मानस सुमति दीपिका पदुकोणला केस धरून ओढलयं. सास्वतनं सांगितलं की या सीनचं शूटिंग सुरु होतं तेव्हा दीपिकाचा पती रणवीर सिंग हा सेटवर उपस्थित होता. याविषयी सांगत सास्वत म्हणाला, 'दीपिका कायम हसताना दिसते. चित्रपटात एक सीन होता जिथे मी तिला केस धरून ओढतोय. हे शूटच्या शेवटच्या काही सीन्सपैकी होता. दीपिका प्रेग्नंट असल्यामुळे मुंबईत त्याची शूटिंग झाली होती. रणवीर सेटवर आला होता. त्यानं वरून खालून सगळं नारंगी रंगाचे कपडे परिधान केले होते. टी शर्ट, पॅन्ट आणि बूट सगळं नारंगी होतं. तो सेटवर येताना पॉजिटिव्ह एनर्जी घेऊन आला होता. रणवीर एका ठिकाणी शांत बसू शकत नाही.'  या चित्रपटात देखील दीपिका प्रेग्नंट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दीपिकाची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि त्याशिवाय सगळीकडे तिच्या अभिनयाची चर्चा होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे सीनविषयी सांगत सास्वत म्हणाले, सीनमध्ये अनेक फिजीकल स्ट्रगल होते. त्यामुळे मी रणवीरला सांगितलं की चिंता करु नको, फिजीकली चॅलेंजिंग सीन्ससाठी बॉडी डबल आहे. सास्वत चटर्जीनं पुढे सांगितलं की रणवीर सिंग खूप नम्र आणि शांत होता. त्यानं हसत मला सांगितलं की 'मला माहित आहे, दादा.' सास्वत चटर्जीची भूमिका मानस सुमतिचा चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये अंत होतो. त्यामुळे पुढच्या भागात ही भूमिका दिसण्याची शक्यता फार कमी आहे. 

हेही वाचा : 'जेव्हा सतत विश्वासघात होतो....', वैवाहिक नात्यातील अपयशावर श्वेता तिवारी थेट असं का म्हणाली? लेकीमुळे तिनं...

'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पादुकोणपासून अनेक कलाकार आहेत. 

Read More