Marathi News> मनोरंजन
Advertisement

जस्टिन बिबरचा नैराश्य अवस्थेतील फोटो व्हायरल

आतंरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बिबरची संपूर्ण दुनीया दिवानी आहे.

जस्टिन बिबरचा नैराश्य अवस्थेतील फोटो व्हायरल

मुंबई : आतंरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बिबरची संपूर्ण दुनीया दिवानी आहे. 'सॉरी', 'बेबी' अशा अनेक गाण्यांनी जगातील तरूणांना त्याने आपल्या आवाजाने वेड लावले. तरूणांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा हा पॉप गायक सध्या एका संकटात असल्याचे वृत्त समोर येत आहे. जस्टिन सध्या नैराश्यग्रस्त झाला असल्याचे समोर येत आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात नैराश्य, तणाव यांसारख्या माणसिक समस्यांचा परिणाम सामान्य माणसांच्या जीवनशैलीवरही पडताना दिसत आहे.

पॉप स्टार मायकल जॅक्सन नंतर तरूणांना घायाळ करणारा २५ वर्षीय पॉप गायक जस्टिन बिबरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जस्टिन नैराश्यतेचा कचाट्यात सापडला असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने भावूक कॅप्शन लिहले आहे. 

 

पॉप स्टार मायकल जॅक्सनने १९९६ साली मुंबईत आपल्या नृत्य कौशल्यतेचे प्रदर्शन केले होते. त्यांतर २०१७ मध्ये सिंन्गिंग स्टार जस्टिन बिबर मुंबईत आला होता. 

Read More