Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तुला खूप माज आलाय का? आम्ही..', Fallow Back साठी धमकावणाऱ्या तरुणीला जुईचं सडेतोड उत्तर; म्हणाली 'पोलीस स्टेशनला..'

Jui Gadkari : जुई गडकरीनं नुकतीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं धमकी देणाऱ्या तरुणीला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

'तुला खूप माज आलाय का? आम्ही..', Fallow Back साठी धमकावणाऱ्या तरुणीला जुईचं सडेतोड उत्तर; म्हणाली 'पोलीस स्टेशनला..'
Updated: Apr 29, 2024, 12:44 PM IST

Jui Gadkari : छोट्या पडद्यावरील मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीनं 'पुढचं पाऊल' या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. जुईचे लाखो चाहते आहेत. जुई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जुई चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे चाहते तिला अनेकदा कमेंट करत तिची स्तुती करतात किंवा तिला मेसेज करुन ते तिचे किती मोठे चाहते आहेत याविषयी सांगताना दिसतात. अशात जुईनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एका तरुणीनं तिला धमकी दिल्याचं सांगितलं आहे. या सगळ्याचा स्क्रिनशॉट देखील तिनं शेअर करत जुईनं तिला खडे बोल सुनावले आहे. 

जुईला तिच्या एका चाहती असलेल्या तरुणीनं इन्स्टाग्रामवर तिला मेसेज केलाय. पण यावेळी तिला तिच्या भूमिकेविषयी बोलताना किंवा तिच्या फोटोविषयी न बोलता, ती फॉलो बॅक करत नाही म्हणून धमकी दिली आहे. याचा स्क्रिनशॉट जुईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये दिसत असलेल्या तरुणीनं केलेल्या मेसेजमध्ये असे म्हटले आहे की "काय गं तुला खूप माज आलाय का? आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? एएए कळत नाही का तुला... आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. त्यानंतर त्या तरुणीनं काही मुला-मुलींची नावं घेतली आणि म्हणाली यांना तू फॉलो कर नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस कारण, आम्हाला वाटलं तू आम्हालापण फॉलो करशील. आणि म्हणून मी आता तुला पोलिसात टाकेन…मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला, समजलं कुठेही पळायचं नाही, ओके बाय."

fallbacks

त्या तरुणीचा हा मेसेज इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर करत जुई म्हणाली, "तू झालीस फेमस... येच कर्जतला बघतेच मी पण!" तर पुढे जुई म्हणाली, "हे सहण केलं जाणार नाही! आधीच सांगते! थेट पोलिस स्टेशनला भेटू."

हेही वाचा : 'ती फोनवर रडत होती अन् आम्ही मदत करु शकलो नाही कारण...', कृष्णा मुखर्जी प्रकरणात अली गोनीचा खुलासा

जुईच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिला पुढचं पाऊल या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या मालिकेत जुईनं कल्याणी ही भूमिका साकारली होती. आजही तिचे अनेक चाहते तिला या नावानं ओळखतात. त्यानंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली. सध्या, 'ठरलं तर मग' या मालिकेत दिसत आहे.