Marathi News> मनोरंजन
Advertisement

जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

पाहा सत्य घटनेवर आधारित 'बाटला हाऊस'चा ट्रेलर

जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असणारा 'बाटला हाऊस' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित करण्याआधी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून दररोज चित्रपटाचे पोस्टर्स, टीझर पोस्ट करण्यात येत होते. त्यामुळे चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. अखेर 'बाटला हाऊस'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 

तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये बॅकग्राउंड स्कोर, सिनेमाटोग्राफी आणि जॉनची जबरदस्त भूमिका दिसत आहे. जॉन अब्राहम संजीव कुमार यांच्या धडाकेबाज भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील इतर सर्व कलाकारांनीही जबरदस्त भूमिका साकारली आहे. मृणाल ठाकूर जॉनच्या पत्नीच्या भूमिकेत असून नोरा फतेहीही चित्रपटात दिसत आहे. 

जवळपास दहा वर्षांपूर्वी दिल्लीतील जामियाँ नगर येथे इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाई करण्यात आली होती. या कारवाईलाच 'बाटला हाऊस' असं नावही देण्यात आलं होतं. त्याच घटनेचा आधार घेत जॉनच्या या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे. भारतातील सर्वाधिक वादग्रस्त एनकाउंटर्सपैकी बाटला हाऊस एक आहे. 

'बाटला हाऊस'मध्ये जॉन अब्राहमसह मृणाल ठाकूर प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय रवि किशन, प्रकाश राज, मनीष चौधरीही चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग दिल्ली, मुंबई, जयपूर आणि नेपाळमध्ये करण्यात आलं आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित 'बाटला हाऊस' येत्या १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

Read More