Marathi News> मनोरंजन
Advertisement

Jhalak dikhla jaa: निती-आकाशचा भन्नाट डान्स, Karan Johar ला अश्रू अनावर, सेटवर ढसाढसा रडला

Jhalak dikhhla jaa season 10: कलर्स टीव्हीने (ColorsTV) आगामी एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ (Promo Video) सोशल मीडियावर शेअर केला. या व्हीडीओमध्ये करण जोहर  (Karan Johar) ढसाढसा रडताना दिसत आहे. 

Jhalak dikhla jaa: निती-आकाशचा भन्नाट डान्स, Karan Johar ला अश्रू अनावर, सेटवर ढसाढसा रडला

मुंबई : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'झलक दिखला जा' (Jhalak dikhla jaa) हा प्रसिद्ध रियलिटी शो (reality show) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 10 व्या सिझनसाठी दिग्दर्शक करण जौहर स्टार अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि नोरा फतेही परीक्षक आहेत. कार्यक्रमात दर आठवड्याला स्पर्धकांना एक स्पेशल थीम दिली जाते. त्यानुसार या शोमध्ये प्रत्येकाला परफॉर्म करावा लागतो. यानुसार या आठवड्यात स्पर्धकांना 'फॅमिली' थीम देण्यात आली होती. त्यावेळी करण जोहर (Karan Johar) भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

कलर्स टीव्हीने (ColorsTV) आगामी एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ (Promo Video) सोशल मीडियावर शेअर केला. या व्हीडीओमध्ये करण जोहर  (Karan Johar) ढसाढसा रडताना दिसत आहे. निती टेलर (Niti Taylor) आणि आकाश थापा (Akash Thapa) या दोन स्पर्धकांनी आपल्या इमोशनल डान्सने सर्वांची मनं जिंकली. स्पर्धकांचा कलाकारी पाहुन परीक्षक देखील भावूक झाले.

करण जोहर ढसाढसा रडला...

स्पर्धकांना फॅमिली थीम देण्यात आली. यानुसार  निती आणि आकाशने डान्स केला. या दोघांनी आपला डान्स करण जोहर   (Karan Johar) आणि त्याच्या कुटुंबियांना समर्पित केला. त्याचबरोबर डान्सच्या शेवटी करण जोहरचा मुलगा यश याचा एक व्हीडीओ क्लिप देखील दाखवण्यात आला. मुलाचा व्हीडीओ पाहून करणला अश्रू अनावर झाले. करणला रडताना पाहून माधुरी दिक्षीत (Madhuri Dixit) आणि नोरा फतेहीने (Nora Fatehi) करणला सावरण्याचा प्रयत्न केला.

निती आणि आकाशच्या मनमोहक डान्सचं करणने तोंडभरून कौतुक केलं. "तुम्हा दोघांना बघून वाटतं की माझी मुलं यश आणि रुही मोठे झालेत. यश आणि रुही माझ्या आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो", असं करण भावूक होत म्हणाला.

TMKOC : 'प्रॉब्लेम तो है..', शो सोडलेल्या कलाकारांची चाहत्यांना भासतेय उणीव

दरम्यान 2017 साली करण जोहरने सरोगसीच्या माध्यमातून मुलाचं पालक्तव स्वीकारलं होतं. सरोगसीच्या माध्यमातून झालेल्या मुलांची नावं यश आणि रुही अशी आहेत.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Read More