Marathi News> मनोरंजन
Advertisement

ब्रॅड पिटच्या पहिल्या बायकोचा दुसरा विवाहही मोडला!

जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ओळखली जाणारी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन आणि तिचा पती जस्टिन थेरॉक्स दोन वर्षांतच एकमेकांपासून विभक्त झालेत.  

ब्रॅड पिटच्या पहिल्या बायकोचा दुसरा विवाहही मोडला!

मुंबई : जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ओळखली जाणारी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन आणि तिचा पती जस्टिन थेरॉक्स दोन वर्षांतच एकमेकांपासून विभक्त झालेत.  

४९ वर्षीय जेनिफर आणि ५६ वर्षीय जस्टिन दोघांनीही एक जॉईंट स्टेटमेंट जाहीर करून आम्ही दोघांनी सहमतीनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. विवाह मोडला असला तरी यापुढेही आपण एकमेकांचे मित्र असू असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

fallbacks
जेनिफर एनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्स

ओळख, प्रेम आणि विवाह

वँडरलस्ट चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली होती. २०१२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. हे दोघे २०११ पासून नात्यात होते. ऑगस्ट २०१५ मध्ये ते विवाहबंधनात अडकले होते.

जेनिफर - ब्रॅड पिट पुन्हा एकत्र?

जेनिफर आणि जस्टिन विभक्त होण्याच्या बातमीनं जेनिफर आणि ब्रॅड पिट यांच्या चाहत्यांना मात्र आनंद झाला आहे. कारण आता पुन्हा एकदा जेनिफर-पिट एकत्र येणार, अशी चर्चा सुरु झालीय. 

fallbacks
एन्जेलिना जोली आणि ब्रॅड पिट 

ब्रॅड पिटही सध्या 'सिंगल'

उल्लेखनीय म्हणजे, एन्जेलिना जोलीपासून विभक्त झाल्यानंतर ब्रॅड पिटही 'सिंगल' आहे. एन्जेलिना आयुष्यात आल्यानंतर ब्रॅडनं जेनिफरसोबतच पाच वर्षांचं नातं २००५ साली तोडलं होतं. 
एन्जेलिनासोबत १२ वर्षांपर्यंत नात्यात राहिल्यानंतर ब्रॅडनं तिच्यासोबत विवाह केला होता. एन्जेलिना आणि ब्रॅड पिट २०१६ साली विभक्त झाले. त्यानंतर ब्रॅडनं आपली पूर्व पत्नी जेनिफर हिची माफीही मागतली होती.

त्यामुळेच, एकेकाळची हॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ओळखले जाणारे जेनिफर आणि ब्रॅड पुन्हा एकत्र येणार का? अशी उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून आहे.   

Read More