Marathi News> मनोरंजन
Advertisement

जया बच्चन यांनी गोविदांच्या 'या' गाण्यावर धरला ठेका

जया बच्चन गेले अनेक दिवस कोणत्याच सिनेमांत दिसल्या नाहीत. 

जया बच्चन यांनी गोविदांच्या 'या' गाण्यावर धरला ठेका

मुंबई : जया बच्चन गेले अनेक दिवस कोणत्याच सिनेमांत दिसल्या नाहीत. 

मात्र त्या कायम कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात आपल्याला दिसतात. नुकत्याच त्या अनिल कपूर यांचा भाचा मोहित मारवाहसोबत ग्रँड लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईत पोहोचल्या होत्या. 

गोविंदाच्या 'या' गाण्यावर धरला ठेका

याच लग्नातर जया बच्चन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत चक्क डान्स करताना दिसत आहे. बॉलिवूडलाईफने दिलेल्या माहितीनुसार, जया बच्चन यांनी चक्क गोविंदाच्या गाण्यावर ठेका धरला आहे. जया बच्चन यांनी ''इश्क है सुहाना'' या गाण्यावर डान्स केला आहे. 

बच्चन कुटुंबियाला जेव्हा लग्नाला आमंत्रित केलं जातं तेव्हा त्या लग्नाला कुणी ना कुणी जाणं पसंद करतात. यावेळी जया बच्चन आपल्या मुलीसोबत श्वेतासोबत लग्नाला पोहोचली होती. यावेळी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आपल्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. 

Read More