Marathi News> मनोरंजन
Advertisement

शाहरुखच्या जागी विजयला घ्यायचे होते? 'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीचा खुलासा...

Shah Rukh Khan Atlee : 'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटासाठी त्याची पहिली पसंती हा शाहरुख खान होता की विजय थलपती होता याविषयी खुलासा केला आहे. 

शाहरुखच्या जागी विजयला घ्यायचे होते? 'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीचा खुलासा...

Shah Rukh Khan Atlee : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा जवान हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटलीनं केले. इतकंच नाही तर या चित्रपटातून अॅटलीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. काही दिवसातच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. असं म्हटलं जातं की जे सीन आपल्याला थिएटरमध्ये पाहायला मिळाले नाही ते ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत. आता या सगळ्यात अॅटलीला विचारण्यात आलं की या चित्रपटासाठी पहिली पसंती हा शाहरुख खान होता की अनेक वेळा काम केलेला दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता थलपति विजय? त्यावर अॅटलीनं काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया...

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अॅटलीला विचारण्यात आलं की चित्रपटासाठी त्याची पहिली पसंती हा शाहरुख खान होता का किंवा त्यानं आजवर अनेकवेळा काम केलेला थलापति विजय होता? त्यावर उत्तर देत अॅटली म्हणाला, जवान फक्त शाहरुख खानसाठीच बनली आहे. माझ्या मनात दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. पण पहिल्या दिवसापासून स्क्रिप्ट, सीन्समध्ये मी काय करणार आहे, कसे करणार आहे, याविषयी मी विजय सरांशी सतत बोलत होतो. ते माझ्या भावासारखे आहेत आणि आम्ही आमच्या कामाला घेऊन खूप सीरिअस आहोत. तर ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहणारे आहेत. आम्ही जवानला घेऊन खूप चर्चा केली, पण पहिली पसंत नेहमची शाहरुख खान होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जवानच्या ओटीटी व्हर्जनविषयी बोलताना अॅटली म्हणाला की त्यासाठी त्याच्याकडे खास प्लॅन आहे. त्याला विचारण्यात आलं की ओटीटीवर येणारा चित्रपट मोठा असेल का आणि तो अनकट असेल का? तर अॅटली म्हणाला, मला वाटतं की आम्ही योग्य भावना थिएटरमध्ये दिल्या आहेत. ओटीटीसाठी आम्ही काही वेगळा प्लॅन करत आहे. त्याचमुळे मी सुट्ट्यांवर गेलो नाही. मी एका गोष्टीवर काम करत आहे. तुमच्या सगळ्यांसाठी हे सरप्राईज असणार आहे. 

हेही वाचा : आधी सेल्फी काढला मग बाटली फेकून मारली... अभिनेत्यासोबत धक्कादायक प्रकार VIDEO VIRAL

पुढे एडिंटिंगनंतर असं वाटतंय की चित्रपटाचा दुसरा भाग आला पाहिजे, यावर बोलताना अॅटली म्हणाला, 'माझा प्रत्येक चित्रपटाची एडिंट ही अशीत असते. मी कधीच माझ्या चित्रपटांचा सिक्वेल बनवण्याचा विचार केला नाही. सध्या मी याला ओपन ठेवलं आहे. असं होऊ शकतं की मी पुढे जाऊन सीक्वल घेऊन येईन. पण येणार नक्की...'

Read More