Marathi News> मनोरंजन
Advertisement

आगामी चित्रपटासाठी संजय लीला भंसाळींची या अभिनेत्याला पसंती

मीजान हा अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा आहे. 

आगामी चित्रपटासाठी संजय लीला भंसाळींची या अभिनेत्याला पसंती

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या चित्रपटात काम करणं हे प्रत्येक बॉलिवूड कलाकारचं स्वप्न असतं. एखाद्या कलाकाराला त्याच्या पदार्पणातच संजय लीला भंसाळी यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तर तो कलाकार यशस्वी असल्याचंच मानलं जातं. भंसाळी यांच्या आगामी चित्रपटातून मीजान हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. कोण आहे हा मीजान...

संजय लीला भंसाळी यांनी आपल्या आगामी चित्रपटात मीजानची प्रमुख भूमिकेसाठी निवड केली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी मीजानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यानंतर मीजानची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. मीजानचे वडीलही बॉलिवूडमधील उत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. अभिनेता, डान्सर, संगीतकार मीजान हा अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा आहे. मीजानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती मात्र अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मीजान जाफरी लवकरच बॉलिवूडमध्ये आपली धमाकेदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. 

fallbacks

fallbacks

२३ वर्षीय मीजानने थिएटर आणि मार्शल आर्टसचं प्रशिक्षण घेतलं आहे. मीजानने डान्सचेही प्रशिक्षण घेतलं आहे. मीजानने चार वर्ष न्यूयॉर्कमधून फिल्ममेकिंगचाही कोर्स केला आहे. २०१५ साली आलेल्या बाजीराव-मस्तानी चित्रपटात मीजानने साहय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. 

Read More