Marathi News> मनोरंजन
Advertisement

जान्हवी कपूरचे सुपर मार्केटमध्ये ठुमके; व्हिडिओ व्हायरल

जान्हवी कपूरने आता इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. 

जान्हवी कपूरचे सुपर मार्केटमध्ये ठुमके; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : जान्हवी कपूरने जेव्हा फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं तेव्हा ती कॅमेऱ्यांसमोर खूप घाबरलेली दिसायची. पण गेल्या ४ वर्षांत ती एकदम कॅमेरा फ्री झाली आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या जान्हवी कपूरने आता इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. यावेळी जान्हवी  सुपर मार्केटमध्ये नाचत असल्याचं दिसत आहे. याचबरोबर तिने तिथे खरेदी करणाऱ्या लोकांनाही स्वत:सोबत जोडल्याचं दिसत आहे.

वरुण धवनचं चॅलेंज पूर्ण केलं 
वरुण धवन लवकरच 'जुग जुग जिओ'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं पहिलं गाणं 'नाच पंजाबन' रिलीज झालं आहे. ज्यावर अनेक रिल्स बनवले जात आहेत. त्याचबरोबर वरुण धवनने जान्हवी कपूरला या गाण्यावर रील बनवण्याचं आव्हान दिलं आणि जान्हवीने हे चॅलेंज अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं. या व्हिडिओमध्ये जान्हवी एका सुपर मार्केटमध्ये दिसत आहे जिथे काही विदेशी लोकं खरेदीमध्ये व्यस्त आहेत. तेव्हाच ती त्यांच्या मागे येते आणि नाच पंजाबन गाण्याच्या हुक स्टेपची कॉपी करू लागते. ज्यामध्ये खरेदी करणारे लोकंही तिला जॉईन होतात.

हा व्हिडिओ शेअर करत जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'सुपरमार्केटमध्ये रॉक, कारण वरुण तू मला आव्हान देण्याचं धाडस केलेस. त्याचबरोबर, जान्हवी कपूरने पोस्टमध्ये 'बवाल' हा शब्द लिहिताच, जान्हवीने जुग जुग जिओचं प्रमोशन केलं आहे की बवाल सुरू केला आहे. असा विचार सर्वांच्या मनात आला. कारण 'बवाल' हा जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट असून त्यात ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. जान्हवीचे चॅलेंज पूर्ण करण्याचा हा अनोखा प्रकार आता सर्वांनाच आवडला आहे.
  

Read More