Marathi News> मनोरंजन
Advertisement

जान्हवीला सतावते अश्लील म्हणून ओळखल्या जाण्याची चिंता, म्हणाली...

"हॉट आणि बोल्ड दिसण्यावर होणारी ट्रोलिंग आवडत नाही..." जान्हवी कपूरचा मोठा खुलासा

जान्हवीला सतावते अश्लील म्हणून ओळखल्या जाण्याची चिंता, म्हणाली...

बॉलिवूड असो किंवा मग दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, सेलिब्रेटी म्हटलं की ग्लॅमर आणि फॅशन या गोष्टी आल्याच. हे कलाकार नेहमीच मुलाखत, चित्रपट प्रमोशन किंवा इतर कोणत्याही खास कार्यक्रमात इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी सर्वांपेक्षा वेगळी फॅशन करण्यावर भर देतात. यात अभिनेत्री जान्हवी कपूर देखील आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हॉट आणि बोल्ड दिसण्यावर होणारी ट्रोलिंग आवडत नाही. या कारणामुळे जान्हवीने तिचा जीम लूक सिंपल ठेवला आहे. 

जान्हवीने नुकतीच एक मुलाखत दिली होती. यामुलाखतीत हॉट आणि बोल्ड कपडे परिधान केल्यामुळे होण्याऱ्या ट्रोलिंगवर म्हणाली, "तिला नेहमीच एका गोष्टीचा भास होतो. ती गोष्ट म्हणजे एखादा फोटो एका ठरावीक अॅंगलने क्लिक केला तर तो अश्लील दिसतो. जर लोकांनी तिला हॉट किंवा बोल्ड म्हटलं तर तिला चालेल पण तिला कोणी अश्लील म्हटलं तर तिला त्याचा फरक पडतो." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे जान्हवी म्हणाली, "कोणतीही मुलगी अश्लील दिसण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडत नाही. काहीवेळा तुमचा फोटो एका विशिष्ट अँगलने काढला जातो आणि मग लोक तुमच्याकडे त्याच नजरेने पाहतात आणि तुमच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभा करतात. त्यावेळी तुम्ही ते कपडे तुमच्या कम्फर्ट नुसार निवडले असतील तरी ते बोलतील." 

जान्हवीने २०१८ साली 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यामध्ये ती ईशान खट्टरसोबत दिसली होती. यानंतर ती 'गुंजन सक्सेना', 'रुही' आणि 'घोस्ट स्टोरीज'मध्ये दिसली. आता लवकरच तिचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Read More