Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' कारणासाठी पुणे पोलिसांनी मानले जॅकलीन फर्नांडीसचे आभार!

कोरोना काळात जॅकलीन फर्नांडीसची चर्चा 

'या' कारणासाठी पुणे पोलिसांनी मानले जॅकलीन फर्नांडीसचे आभार!

मुंबई : सद्या पसरलेल्या कोरोनाच्या या संकट काळात अनेकजण इतरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये जॅकलीन फर्नांडीसचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, जिने या संकट काळात मदत करण्याचा आणि समाजाच्या तळागाळात मदत पोहोचवण्यासाठी आपला हात पुढे केला आणि या मदतीसाठी पुणे पोलिसांनी जॅकलीन फर्नांडीसचे आभार मानले आहेत. 

जॅकलीनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर मेहनती पुणे पुलिस दलासाठी लिहिले की, 

जॅकलीन फर्नांडीसने नुकतीच 'यू ओनली लिव वन्स' (वायओएलओ) फाउंडेशनची सुरुवात केली असून ज्याद्वारे अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यात येणार आहे. संस्थेच्या माध्यमातून 1 लाख भोजन, मुंबई पुलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

जॅकलीनला असे वाटते की समाजासाठी काही चांगलं करण्याचा हा प्रयत्न असून गरजू लोकांच्या मदतीसाठी ती सदैव तयार असते. एवढेच नव्हे, तर मागील वर्षी महाराष्ट्रातील पथराडी आणि सकुर गावातील गावकऱ्यांच्या पोषणासाठी 'एक्शन अगेंस्ट हंगर फाउंडेशन' सोबत सहयोग केला होता.

Read More