Marathi News> मनोरंजन
Advertisement

शूटिंगच्या शेवटच्या दिवशी भावूक झाली जॅकलिन...

 जॅकलिन फर्नांडिस रेस ३ च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग बॅंकॉकला करत होती.

शूटिंगच्या शेवटच्या दिवशी भावूक झाली जॅकलिन...

नवी दिल्ली : जॅकलिन फर्नांडिस रेस ३ च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग बॅंकॉकला करत होती. मात्र शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ती अत्यंत भावूक झाली. शूटिंगनंतर जॅकलिन आपल्या भावनांना आवरू शकली नाही.

जॅकलिनने आपल्या इंस्टाग्रामवर रेस ३ चे दिग्दर्शक रेमो डिसूझा यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, मला रडू येत आहे. आता मला मेकअप करायचा नाही. जॅकलिनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, मॅजिशियन माझ्या शेवटच्या शॉटची तयारी करत आहेत.

या अॅक्शन थ्रिलर सिनेमात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी दिसणार आहे. हा सिनेमा यावर्षात ईदच्या मृहुर्तावर प्रदर्शित होईल.

Read More