Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : लेकीचं कन्यादान करताना भावूक मुकेश अंबानी

लग्नातील हे व्हिडिओ व्हायरल 

VIDEO : लेकीचं कन्यादान करताना भावूक मुकेश अंबानी

मुंबई : ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचा विवाहसोहळा मुंबईतील अँटीलियामध्ये 12 डिसेंबर रोजी संपन्न झाला. या ग्रँड लग्नात बिझनेस वर्ल्ड, बी टाऊन, राजकारण आणि खेळ क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते. लग्नाच्यावेळी कन्यादान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत ईशाचं कन्यादान करताना मुकेश अंबानी आणि नीता अंबानी इमोशन होताना दिसत आहेत. कन्यादान करण्याच्या सर्व रीति बिग बी अमिताभ बच्चन यांनी पाहुण्यांना समजावून सांगितल्या. 

बिग बी सांगत होते की, हा सगळ्यात भावनिक क्षण असतो. जेव्हा एक बाप आपल्या आयुष्यातील सर्वात अनमोल गोष्ट कुणा दुसऱ्या व्यक्तीला सोपत असतो. ही भावना प्रत्येक बापाला सलणारी असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ishaambani #anandpiramal #bigfatindianwedding #desiwedding #ambaniwedding #ishakishaadi #nitaambani  @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पुढे बिग बी सांगतात की, या विधीतून नववधुचे वडिल आपल्या जीवनातील एक भावनात्मक धन देखील त्या मुलाला देत असतो. तसेच हा दोन्ही परिवाराच्या भेटीचा क्षण असतो. या नंतर हे दोन कुटुंब एक होणार असतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ishaambani #anandpiramal #bigfatindianwedding #desiwedding #ambaniwedding #ishakishaadi #nitaambani  @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

ईशाच्या लग्नातील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो म्हणजे जयमाला घालतानाचा व्हिडिओ. एकमेकांच्या गळ्यात माळ घालताना खूप खेळकर वातावरण आहे.

दोघांना त्यांच्या मित्र परिवाराने उचलून घेतलं आहे. सर्वात अगोदर आनंद पीरामल यांनी ईशा अंबानीला माळ घातली. त्यानंतर ईशाने आनंदच्या गळ्यात माळ घातली. बॅकग्राऊंडला सीता -राम यांच्या मिलनाच म्युझिक वाजत होतं.

Read More