Marathi News> मनोरंजन
Advertisement

विवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करते साई पल्लवी?

Sai Pallavi Dating a Married Actor With 2 Kids :  साई पल्लवी करते एका विवाहित अभिनेत्याला डेट! 

विवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करते साई पल्लवी?

Sai Pallavi Dating a Married Actor With 2 Kids : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीनं गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी 'रामायण' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या अभिनयासाठी ओळखली जाणारी साई जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे कळलं तेव्हा पासून याच एका गोष्टीची चर्चा रंगली आहे. आता तमिळ मीडियानं दिलेल्या एका माहितीमुळे साईच्या चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. 

रिपोर्ट्सनुसार, साई पल्लवी ही एका विवाहित अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याशिवाय त्या विवाहीत अभिनेत्याला दोन मुलं देखील आहेत. मात्र, या मागचं सत्य काय आहे हे अजून काही समोर आलेलं नाही. या बातमीनं तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, या सगळ्या अफवांमागचं सत्य हे अजून उघडकीस आलेलं नाही. दरम्यान, तिच्या फॅन क्लबचं म्हणणं आहे की ही फक्त एक अफवाह आहे. आता यावर जोपर्यंत साई, तिच्या टीममधील कोणी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इतकंच नाही तर त्याशिवाय तिच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीनं प्रतिक्रिया दिलेली नाही. 

साई विषयी बोलायचं झालं तर तिच्या डान्सच्या स्किल्सनं अर्थात कौशल्यांनी तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. त्यामुळे ती अभिनेत्रीच्या रुपात खूप चांगल्या पद्धतीनं समोर येते. आपल्या समजूतदार पणासाठी ओळखल्या जाणाऱ्या साई पल्लवीचे लाखो चाहते आहेत. साईनं तेलगू, तमिळ आणि केरळ चित्रपटसृष्टीत कमालीचं काम केलं आहे. काही तरी इम्पॅक्ट देणाऱ्या ज्या भूमिका असतात त्या साई निवडताना दिसते. तिला तिच्या चाहत्यांमध्ये एक वेगळंच स्थान मिळालं आहे. 

हेही वाचा : जान्हवी कपूरने पुन्हा केली नाकाची सर्जरी? नवीन फोटोमुळे चर्चांना उधाण

दरम्यान, साईच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती 'रामायण' या चित्रपटात देवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करणार आहेत. तर प्रभू राम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहेत. त्याशिवाय ती तेलगू चित्रपट थंडेल या चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर ती आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. त्या दोघांचा जपानमधील Sapporo Snow Festival मधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Read More