Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात? या खास व्यक्तीने दिली हिंट

समांथांने गेल्या वर्षीच नागा चैतन्यपासून घटस्फोटाची (Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya) घेतला.

घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात? या खास व्यक्तीने दिली हिंट

Samantha Ruth Pardhu Second Marriage: समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या करिअरच्या हाय पीकवर आहे. तिचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पामधील (Oo Antava in Pushpa) तिचे आयटम साँग 'ऊ अंतवा' प्रचंड गाजले आता सर्वजण तिच्या 'यशोदा' (Yashoda) या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. फक्त चित्रपटच नाहीत तर तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चे असते. (is popular south indian actress going to marry samantha ruth prabhu second time this special person from her life gives the hint)

समांथांने गेल्या वर्षीच नागा चैतन्यपासून घटस्फोटाची (Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya) घेतला जी यावर्षीची मनोरंजन विश्वातील सर्वात मोठी बातमी होती. आता तिच्या दुसऱ्या लग्नाच्या अफवा इंटरनेटवर पसरत आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार समंथा रुथ प्रभूनं दुसरं लग्न करण्यासाठी होकार दिल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. समांथा सद्गुरु जगदीश वासुदेव (Sadguru) यांना आपले गुरू मानते यांनी तिला लग्न करण्यासाठी राजी केले आहे असे समजते.

कॉफी विथ करण 7 (Coffee With Karan) मध्ये सामंथाने सांगितले होते की ती अद्याप दुसऱ्या लग्नाचा विचार करत नसून सध्या ती कामावरच भर देणार आहे. पण आता अशी बातमी समोर आली की सद्गुरूंनी सामंथाचे मन बदललं आहे आणि तिला दुसऱ्या लग्नाचा विचार करण्यास राजी केले आहे. सध्या या बातमीबद्दल कोणीतीही ग्वाही नाही. 

नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथा रुथ प्रभूला खूप त्रास सहन करावा लागला कारण ती सतत सोशल मीडियावर ट्रोल होत होती. तिच्यावर सोशल मीडियावर विविध आरोपही करण्यात आले. परंतु मोठ्या ताकदीने तिने ते ट्रोल्सना प्रत्युत्तर दिले.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये नामवंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. सध्या तिचे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. 

Read More